High Cholesterol Symptoms esakal
लाइफस्टाइल

High Cholesterol Symptoms: कोलेस्टेरॉल वाढलं तर या अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना; चाळीशीनंतर घ्या काळजी!

तेलकट अन्नामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते

Pooja Karande-Kadam

High Cholesterol Symptoms: सध्याच्या काळात लोक आरामशीर लाईफस्टाईल ठेवतात आणि आजारी पडतात. पूर्वीच्या काळात लागेल तेवढे खाणे आणि शेतीची अवघड कामे करणे असं जीवनमान असल्याने लोक आजारी पडायचेच नाहीत.

पण आता खाण्याला काही सुमार नाही अन् कामही आरामात एसीत बसून. मग वाढतं वजन अन् त्यात व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत.

BP, शुगर यासारख्या आजारांसारखाच कोलेस्टेरॉल वाढणे हे देखील सामान्य झाले आहे. तंत्रज्ञान जसजसे प्रगती करत आहे तसतसे आपण पूर्वीपेक्षा अधिक आळशी होत चाललो आहोत. कमी शारीरिक हालचाली आणि तेलकट अन्नामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होऊ लागते.

यामुळे पुढे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल व्हेसल डिसीज सारखे आजार होतात. (High Cholesterol Symptoms: Sharp pain in these 3 parts of the body? Is this a sign of rising cholesterol?)

कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

कोलेस्ट्रॉल हा एक चिकट पदार्थ आहे जो चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो. चांगल्या कोलेस्टेरॉलच्या माध्यमातून शरीरात निरोगी पेशी तयार होतात, तर खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो. (Health Tips)

कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे

  1. मळमळणे

  2. शरीर सुन्न पडणे

  3. खूप थकवा जाणवणे

  4. अचानक छातीत दुखायला लागणे

  5. श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे

  6. हात पाय थंड पडणे

  7. उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होणे.

रक्तात कोलेस्टेरॉल किती असावे?

निर्धारित मानकांनुसार, निरोगी प्रौढांमध्ये 200 मिलीग्राम / डीएल पर्यंत कोलेस्ट्रॉल असले पाहिजे, जर ही पातळी 240 मिलीग्राम / डीएल ओलांडली तर समजून घ्या की धोका वाढला आहे आणि आपल्याला आपल्या जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे.

आपल्याला परिघीय धमनी रोग आहे का?

जर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर आपल्याला पेरिफेरल आर्टरी डिजीज देखील होऊ शकतो. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. वास्तविक, यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. (Weigh Loss Tips)

शरीराच्या या भागांमध्ये तीव्र वेदना होतात.

कारण पेरिफेरल आर्टरी डिजीज शरीरातील रक्ताच्या प्रवाहात व्यत्यय आणतो, ज्यामुळे शरीरात बदल होणे बंधनकारक आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता किंवा जड वर्कआउट करता, किंवा

तेव्हा मांडी, नितंब आणि पायात तीव्र वेदना होतात. त्यामुळे अशा पेनांकडे दुर्लक्ष करू नका आणि कोलेस्टेरॉलची पातळी ताबडतोब तपासा.

चाळीशीनंतर ही काळजी घ्यावी

नॅशनल हार्ट लंग एंड ब्लड इंस्टीट्यूट (एनएचएलबीआई) यांनी असा सल्ला दिला आहे की, पुरुषांना ज्यांचे वय 45 ते 65 वर्षे आहे त्यांनी आणि स्त्रिया ज्यांचे वय 55 ते 64 वर्षे आहे त्यांनी दर एक ते दोन वर्षांनी ब्लड टेस्ट केली पाहिजे. जर तुमचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे तर मात्र तुम्ही दर वर्षी कोलेस्टेरॉलची टेस्ट केलीच पाहिजे असे जाणकार सांगतात.(Bad Cholesterol)

त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या आसपास सुद्धा कोणाला या बाबत माहिती हवी असले तर त्यांच्यात जागरूकता पसरा. तेव्हाच या आतल्या आजाराशी आपण लढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT