Highest Salary Countries esakal
लाइफस्टाइल

Highest Salary Countries : नोकरी करून मालामाल होण्याचा सुपर फंडा; जगातल्या या देशात मिळतो भरगच्च पगार!

जास्त पगार असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा सर्वात शेवटचा नंबर

Pooja Karande-Kadam

Highest Salary Countries : आपल्या कुटुंबाची प्राथमिक गरजा भागवण्यासाठी प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाचा पर्याय निवडत असतो. त्यातून मिळणारा आर्थिक मोबदला हा कुटुंबाची आणि आपली आर्थिक गरज भागवतो.

कोणत्या देशांतील नागरिकांना किती पगार दिला जातो याबाबत प्रत्येकालाच कुतूहल असते. जगातल्या बऱ्याच देशात दरमहा किती सरासरी पगार दिला याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. (Salary)

या अहवालानुसार  भारतातील नोकरदारांचा दरमहा सरासरी पगार 50 हजारांपेक्षा कमी असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या अहवालात भारतासोबतच जगातील इतर देशांतील नागरिकांच्या दरमहा पगाराची माहिती देखील देण्यात आली आहे.

या यादीत असे 23 देश आहेत, ज्यांचे सरासरी दरमहा वेतन एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. (Highest Salary Countries : top 10 countries with highest employee salaries in the world)

भविष्यात आपले करिअर सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येकजण चांगला अभ्यास करतो. त्यांना भविष्यात सहज नोकरी मिळू शकते. त्यासाठी त्यांना जास्त शोध घ्यावा लागत नाही. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा 10 देशांबद्दल सांगणार आहोत जिथे काम करणाऱ्या लोकांना इतर देशांच्या तुलनेत जास्त पगार मिळतो.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर सर्वाधिक सरासरी पगार असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, सिंगापूर, अमेरिका, आइसलँड, कतार, डेन्मार्क, यूएई, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

स्वित्झर्लंड हा सर्वाधिक पगार देण्याच्या बाबतीत युरोपमधील देश पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या लोकांचा सरासरी निव्वळ पगार ६,०९६ डॉलर आहे.  

तर लक्झेंबर्ग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यात लोकांचा सरासरी पगार 5015 डॉलर आहे. सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंगापूरमधील लोकांचा सरासरी पगार ४९८९ डॉलर आहे. महासत्ता अमेरिका या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. इथल्या लोकांचा सरासरी पगार ४२४५ डॉलर आहे.

या यादीत आइसलँड पाचव्या क्रमांकावर आहे. इथला सरासरी पगार ४००७ डॉलर आहे. सर्वाधिक पगार देणारा हा सहावा देश आहे. इथला सरासरी पगार सुमारे ३९८२ डॉलर आहे. या यादीत डेन्मार्क सातव्या क्रमांकावर असून, त्याचा सरासरी पगार 4989 डॉलर आहे. (Other Countries) 

सरासरी मासिक पगार असलेल्या देशांची यादी:

स्वित्झर्लंड: $6,096 (4,98,567 रुपये)
लक्झेंबर्ग: $5,015 (4,10,156 रुपये)
सिंगापूर: $4,989 (4,08,030 रुपये)
अमेरिका: $4,245 (3,47,181 रुपये)
आइसलँड: $4,007 (3,27,716 रुपये)
कतार: $3,982 (3,25,671 रुपये)
डेन्मार्क: $3,538 (2,89,358 रुपये)
संयुक्त अरब: $3,498 (2,86,087 रुपये)
नेदरलँड: $3,494 (2,85,756 रुपये)
ऑस्ट्रेलिया: $3,391 (2,77,332 रुपये)
नॉर्वे: $3,289 (2,68,990 रुपये)
जर्मनी: $3,054 (2,49,771 रुपये)
कॅनडा: $2,997 (2,45,109 रुपये)
युनायडेट किंगडम: $2,924 (2,39,139 रुपये)
फिनलँड: $2,860 (2,33,905 रुपये)
ऑस्ट्रिया: $2,724 (2,22,782 रुपये)
स्वीडन: $2,721 (2,22,534 रुपये)
फ्रान्स: $2,542 (2,07,894 रुपये)
जपान: $2,427 (1,98,489 रुपये)
दक्षिण कोरिया: $2,243 (1,83,441 रुपये)
सौदी अरब: $2,002 (1,63,731 रुपये)
स्पेन: $1,940 (1,58,660 रुपये)
इटली: $1,728 (1,41,322 रुपये)
दक्षिण आफ्रिका: $1,221 (99,857 रुपये)
चीन: $1,069 (87,426 रुपये)
ग्रीस: $914 (74,749 रुपये)
मॅक्सिको: $708 (57,902 रुपये)
रशिया: $645 (52,750 रुपये)
भारत: $573 (46,861 रुपये)
तुर्की: $486 (39,746 रुपये)
ब्राझील: $418 (34,185 रुपये)
अर्जेंटीना: $415 (33,939 रुपये)
इंडोनेशिया: $339 (27,724 रुपये)
कोलंबिया: $302 (24,698 रुपये)
बांग्लादेश: $255 (20,854 रुपये)
वेनेजुएला: $179 (14,639 रुपये)
नायजेरिया: $160 (13,085 रुपये)
इजिप्त: $145 (11,858 रुपये)
पाकिस्तान: $145 (11,858 रुपये)

सर्वात जास्त पगार घेणारा व्यक्ती आहे भारतीय

जगातला सर्वात मोठा पगारदार हा भारतीय आहे. त्यांचे नाव जगदीप सिंग असे आहे. हा व्यक्ती अॅलन मस्कपेक्षाही जास्त पगार घेणारा आहे. जगदीप हे क्वॉन्टम स्केप कंपनीचे संस्थापक आहे. कंपनीचे सीईओ म्हणून सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

जगदीप सिंग यांचा एक दिवसाचा पगार ४८ कोटी रुपये आहे. म्हणजे त्यांचा एक दिवसांचा पगार हा अनेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल आहे. जगातील अग्रगण्य कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय आहे. त्यामुळे आता जगातील सर्वाधिक पगार घेण्याचा मान हा एका भारतीय व्यक्तीला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT