Holi 2024 : आज धुलिवंदन आहे, आपल्याकडे रंगपंचमीला रंग खेळण्याची प्रथा असली. तरी उत्तर भारतात आजच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. होळी दिवशी होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.
या दिवशी रंगोत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी कोरडे रंग गालावर लावले जायचे. आणि आता केमिकलयुक्त, पावडरीचे रंग पोत्यांने उधळले जातात. या रंगाचे वाईट परिणाम केवळ आपल्या त्वचेला भोगावे लागत नाहीत. तर, त्यासोबत दमा असलेल्या रूग्णांनाही हे भोगावे लागते.
दमा असलेल्या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास झाला तर ते त्यांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे, रंगांच्या धुरळ्यात दमा असलेल्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी, हे पाहुयात.
दमा हा फुफ्फुसाच्या सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण आली. तर कधीही कोठेही अस्थमाचा जीवघेणा अटॅक येऊ शकतो.
दमा असलेल्या लोकांच्या श्वासनलिका अरुंद आणि सुजलेल्या असतात ज्यामुळे हवा जाणे कठीण होते. दम्याची लक्षणे अशी आहेत की, श्वासोच्छवासाची झटपट उबळ येते. खोकला, श्वास घेताना शिट्टीच्या आवाजाने घरघर येणे आणि दम लागणे ही होय.
रंग का घातक आहेत?
वातावरणातील बदलामुळे दमा रुग्णांना आरोग्यविषयक गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. रंग भरणे आणि परिणामी वातावरणात होणारे प्रदूषण हे देखील जोखीम घटक असू शकते.
एका अभ्यासानुसार, होळीचे रंग आणि गुलाल पावडरमध्ये अनेक लहान कण असू शकतात, ज्यामुळे फुफ्फुसाच्या समस्या तर वाढतातच पण तुमच्या श्वसनसंस्थेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच ज्यांना आधीच दमा किंवा श्वासोच्छवासाचा त्रास आहे त्यांनी खबरदारी घ्यावी.
होळीच्या रंगांमध्ये शिसे आणि अनेक विषारी पदार्थ असण्याचा धोका असतो, त्यांच्या संपर्कात आल्यास ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
होळीच्या वेळी श्वसनाच्या रुग्णांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. होलिका दहनाच्या वेळी श्वासोच्छवासाचा त्रास असणाऱ्यांनी धुरापासून दूर राहावे. होळीच्या दिवशी घराबाहेर पडताना मास्क घालणे गरजेचे आहे जेणेकरून हवेतील वाईट कणांपासून संरक्षण करता येईल.
रंगांपासूनही दूर राहा
चेहऱ्याच्या आणि नाकाच्या आसपासचे रंग लगेच स्वच्छ करा. श्वासोच्छवासाच्या औषधांबाबत बेफिकीर राहू नका, नेहमी सोबत इनहेलर ठेवा.जेव्हा तुम्हाला श्वास घेण्यास त्रास किंवा खोकला वाढला आहे असे वाटेल तेव्हा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आहार आणि पाणी
पौष्टिक आहार घेतल्यास श्वसनाच्या रुग्णांना अनेक प्रकारच्या गुंतागुंतीपासून संरक्षण मिळू शकते. रंगांमुळे किंवा कमी पाणी पिल्याने घसा कोरडा झाल्याने डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पौष्टिक आणि सकस आहारासोबत भरपूर पाणी प्या. होळीच्या वेळी कोणत्याही प्रकारची नशा टाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.