हिंदू धर्मात होळी सणाला महत्त्व आहे होळीनंतर ऋतूबदलही होतो. यंदा २४ मार्चला होळी दहन आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याचा दिवस आहे. तुम्हाला माहितीय का, होळी पेटवताना रंगेबीरंगी कपडे घातलेले लोक दुसऱ्या दिवशी फक्त पांढरेच कपडे का घालतात. याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
धर्म शास्त्रानुसार, होळी उत्सवाचा, आपुलकी आणि प्रेमाचा सण आहे. रंग लावताना आपण जात-पात पाहत नाही. सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतो. अशा या पवित्र सणाला पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते.
पांढऱ्या रंगाच्या कपड्यांनी मनाला शांती मिळते. कारण पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे. पांढरे कपडे हे सकारात्मक उर्जा निर्माण करतात. त्यामुळेच असे कपडे घातल्याने चिंता, भय मनात राहत नाही. (Holi 2024)
पांढऱ्या कपड्यांचे धार्मिक महत्त्व काय आहे?
ज्योतिषशास्त्रानुसार होळी दिवशी राहूदेवतेचा स्वभाग रागीट होतो. ज्याच्या प्रभावाने राहूची वाईट नजर थेट मनुष्याच्या कुंडली आणि स्वभावाला प्रभावित करते. ज्यामुळे मनुष्य वाईट संगतीला लागू शकतो. त्याच्याकडून वाईट कर्म घडू शकतात.
राहूच्या वाईट छायेत आलेली व्यक्ती कुटुंबाशी सुद्धा जुळवून घेत नाही. त्यावर उपाय म्हणून पांढरे कपडे घालण्यास सांगितले जाते. पांढरे कपडे व्यक्तीच्या मनावर परिणाम करतात. माणसाचं मन शांत करतात. त्यामुळे त्याच्याकडून सणादिवशी कोणतेही वाईट कृत्य घडत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.