Home Care Tips, how to get rid of termites Esakal
लाइफस्टाइल

Home Care Tips: घराच्या भिंतीना वाळवी लागलीय? मग या उपायांनी वाळवी होईल नष्ट

Home Care खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये Monsoon जर घराच्या भिंतींमध्ये ओलावा राहत असेल तर भिंतींना वाळवी लागण्याची शक्यता वाढते. या वाळवीवरचा उपाय घेऊ जाणून....

Kirti Wadkar

घरामध्ये स्वच्छता राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. घरातील लोकांच्या आरोग्यासाठी घर स्वच्छ ठेवणं जसं गरजेचं आहे. तसचं घराच्या आरोग्यासाठी घराची स्वच्छता महत्वाची आहे.

म्हणजेच घरातील फर्निचर जास्त काळ टिकावं, उपकरणं टिकावी तसचं घराच्या भिंती आणि रंग Color जास्त काळ टिकावा यासाठी देखील घराची नियमितपणे स्वच्छता करणं गरजेचं असतं. Home Cleaning Marathi Tips Know how to take care of Termite to protect home

Home Care घराच्या भिंतींची किंवा छताची स्वच्छता Home Cleaning न केल्यास अनेकदा घरामध्ये झुरळं किंवा कोळी घर करतात. मात्र याहून मोठी अडचण असते ती म्हणजे वाळवी Termite . घराच्या भिंतींना वाळवी लागल्यास भिंत पोकळ होवू शकते.

यामुळे भिंत खराब होते. खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये Monsoon जर घराच्या भिंतींमध्ये ओलावा राहत असेल तर भिंतींना वाळवी लागण्याची शक्यता वाढते.

लाकडी फर्निचर असो वा भिंत, वाळवी लाकूड आणि भिंत पोखरू लागते. यामुळेच वाळवीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास मोठा धोका निर्माण होवू शकतो. वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हॉट स्प्रेचा वापर करु शकता. यासाठी तुम्हाला बाजारातून हॉट स्प्रे खरेदी करण्याची आवश्यकता नाही घरीच तुम्ही हा स्प्रे तयार करू शकता.

वाळवीसाठी असा तयार करा स्प्रे

  • यासाठी २ मोठ्या तिखट मिरच्या बारीक कापून घ्याव्या.

  • २ कप गरम पाण्यामध्ये या लाल मिरच्यांचे तुकडे अर्धा तासांसाठी भिजत ठेवा.

  • अर्धा तासानंतर बारीक गाळणीच्या मदतीने एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी गाळून घ्या.

  • हा स्प्रे वाळवी लागलेल्या भिंतीवर केल्यास वाळवी नष्ट होण्यास मदत होईल. एवढचं नव्हे तर घरातील कीटक-कोळी देखील नाहीसे होतील.

हे देखिल वाचा -

वाळवी मारण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साइड

घरातील चांगल्या पेंट केलेल्या आणि सुंदर दिसणाऱ्या भिंतींना वाळवी लागल्यास त्या भिंत पोखरण्यास सुरुवात करतात. यामुळे हळूहळू भिंतीचा रंग निघू लागतो. कालांतराने प्लॅस्टरदेखील निघू लागतं आणि भिंती कुरुप दिसू लागतात. यासाठीच भिंत खराब होण्यापूर्वीत वाळवीचा बंदोबस्त केल्यास भिंती सुरक्षित आणि सुंदर राहतील.

  • वाळवीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करू शकता.

  • एका स्प्रे बॉटलमध्ये अर्धा कप हायड्रोडन पॅरॉक्साईड आणि अर्धा कप पाणी घ्या.

  • यामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा.

  • बॉटल चांगली हलवून मिश्रण एकजीव करून घ्या.

  • वाळवी लागलेल्या भिंतीवर तुम्ही या स्र्पेचा वापर करू शकता. यामुळे वाळवी त्वरित मरेल.

  • हायड्रोजन पॅरॉक्साइड एक केमिकल असल्याने या स्प्रेचा वापर करताना हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करा. तसंच लहान मुलं स्प्रेच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी घ्या.

हे देखिल वाचा -

वाळवी मारण्यासाठी व्हिनिगरचा उपाय

  • घरात विविध प्रकारची स्वच्छता करण्यासाठी व्हिनिगरचा वापर प्रभावी ठरतो. त्याचप्रमाणे घरामध्ये भिंतीला लागलेली वाळवी दूर करण्यासाठी देखील तुम्ही व्हिनिगर वापरू शकता.

  • एका बॉटलमध्ये व्हिनिगर आणि पाणी समप्रमाणात घ्या.

  • यामध्ये २ चमचे बेकिंग सोडा आणि १ चमचा लिंबाचा रस टाका.

  • मिश्रण एकजीव करून हे पाणी वाळवी लागलेल्या भिंतीवर शिंपडा.

  • तसंच हे पाणी तुम्ही इतर भिंतींवरही शिंपडू शकता. ज्यामुळे भिंतींना वाळवी लागणार नाही.

  • अशा प्रकारे काही सोप्या उपायांमुळे घरातील भिंतींना लागलेली वाळवी सहज दूर होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT