Natural Face Pack Esakal
लाइफस्टाइल

Natural Face Pack: घरच्या घरी तयार करा स्क्रब आणि पहा कमाल

बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक स्क्रब Face Scrub उपलब्ध आहेत मात्र या अनेक स्क्रबमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स चा वापर केलेला असतो यामुळे त्वचेला Skin दीर्घकाळात नुकसान होऊ शकतं

Kirti Wadkar

Natural Face Pack: आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात अनेकदा हे डेट सेल्स त्वचेच्या वरच्या थरावर जमा होतात आणि ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो.

खरं तर डेट्स हे नैसर्गिक रित्या Naturally निघून जात असतात मात्र अनेकदा प्रदूषण आणि केमिकल्स Chemicals असलेले प्रॉडक्ट वापरल्याने ही प्रक्रिया हळू होते म्हणूनच डेड काढून टाकण्यासाठी त्वचेवर वरचेवर स्क्रब करणं गरजेचं असतं. Home Made Scrubs will Kepp your face glow Marathi Beauty Hacks

बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक स्क्रब Face Scrub उपलब्ध आहेत मात्र या अनेक स्क्रबमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स चा वापर केलेला असतो यामुळे त्वचेला Skin दीर्घकाळात नुकसान होऊ शकतं यासाठीच आम्ही तुम्हाला स्क्रबचे काही घरगुती आणि नैसर्गिक पर्याय सांगणार आहोत. homemade face scrub 

कॉफी स्क्रब

कॉफीला एक्सपोलिएटर म्हणून वापरू शकता. कॉफीमधील फ्लेवनॉल्स त्वचा सुधारण्यास मदत करतात. कॉफी स्क्रब बनवण्याठी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉफी पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा बदाम तेल, एक चमचा मध आणि एक चमचा बारीक साखर एकत्र करावी. 

या पेस्टने चेहऱ्यावर चांगलं स्क्रब करावं. बोटांच्या मदतीने गोलाकार संपूर्ण एक मिनिट मसाज करावं. त्यानंतर ५ ते १० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. 

संत्र्याच्या सालीची पावडर

हे स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्यांच्या साली सावलीत वाळवून घ्याव्या. त्यातर या सालींची बारीक पावडर तयार करून एका हवाबंद बरणीत भरून ठेवावी. स्क्रब करण्यासाठी एक मोठा चमचा संत्र्याच्या सालीची पावडरमध्ये एक चमचा दही मिसळून पेस्ट तयार करावी. 

या पेस्टने चेहरा आणि मानेला चांगलं स्क्रब करावं. त्यानंतर ही पेस्ट २० मिनिटं चेहऱ्याव राहू द्यावी. २० मिनिटांनी पुन्हा हलक्या हातेने गोलाकार स्क्रब करावं. यामुळे हळूहळू वाळलेली पेस्ट निघेल. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. 

हे देखिल वाचा-

साखर आणि ऑलिव्ह ऑईल

अर्धा कप साखरेमध्ये दोन चमचे एक्स्ट्रा-वर्जिन ऑलिव्ह आईल तेल मिसळा. यात एक चमचा मध आणि काही लिंबाचे थेंब टाका. या स्क्रबने चेहऱ्याला आणि गळ्याला स्क्रब करा आणि २० मनिटं चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर तुम्ही हाताला देखील या स्क्रबचा वापर करू शकता.

ओट्स स्क्रब

ओट्स स्क्रब बनवण्यासाठी मिक्सरमध्ये ओट्सची भरड पावडर तयार करावी. स्क्रब तयार करण्यासाठी एक चमचा ओट्स पावडरमध्ये एत चमचा दही आणि अर्धा चमचा  मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला १० मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर बोटं पाण्याने थोडी ओली करून चेहऱ्यावर सर्कुलर मोशनमध्ये म्हणजेच गोलाकार मसाज करा. चेहरा चांगला स्क्रब झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. 

ओट्समध्ये अँटीइंफ्लेमेट्री कंपाउंड आणि सॅपोनिन आढळतं. तर दही त्वचा स्वच्छ करून चेहऱ्यावरील अतिरिक्त सीबम निर्मिती कमी करतं. यातील मधामुळे चेहरा उजळण्यास आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.

मसुर डाळ स्क्रब

चेहरा उजळून डेड स्किन काढण्यासाठी मसुर डाळीचं स्क्रब हे प्रभावी काम करत. यासाठी मसूरडाळीची भरड पावडर तयार करून घ्यावी. एका वाटीत २ चमचे मसूर डाळ पावडर घ्यावी. त्यात चिमूटभप हळद आणि एक चमचा दही घ्यावं. 

या पेस्टने चेहऱ्याला चांगलं २-३ मिनिटं स्क्रब करावं. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. 

नारळाचं तेल आणि साखर

हा घरगुती स्क्रबचा अगदी सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. एक चमचा कोमट नारळाच्या तेलामध्ये एक चमचा सारख मिसळून हलक्या हाताने चेहरा आणि गळ्याला गोलाकार स्क्रब करावं. त्यानंतर चेहरा आधी कोमट पाण्याने धुवावा. त्यानंतर लगेचच चेहरा गार पाण्याने धुवावा. 

नारळ तेल त्वचेवर साचलेल्या सर्व प्रदूषण कण दूर करण्यास मदत करतं. तसचं यामुळे त्वचेला गरजेचं असलेलं पोषणही मिळत. तर साखरेचे दाणे चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतात. आठवड्यातून दोनचा या स्क्रबचा वापर केल्यास फरक जाणवेल.  

हे देखिल वाचा-

बदाम आणि दूध

बदाम आणि दूधाचं स्क्रब तयार करण्यासाठी ४-५ बदाम रात्री कोमट दूधामध्ये भिजत ठेवावे. सकाळी मिक्सरला त्याची भरड पेस्ट तयार करावी. या पेस्टेने चेहऱ्याला २-३ मिनिटं स्क्रब करावं. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. 

या स्क्रबमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघण्यासोबतच ब्लॅकहेड्स निघण्यास मदत होईल. नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी हे स्क्रब उपयुक्त आहे. 

अशा  प्रकारे केवळ घरगुती आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तुम्ही चेहरा स्क्रब करू शकता. ज्यामुळे चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT