Home Made Shampoo  esakal
लाइफस्टाइल

मेथीपासून बनवलेला Home Made Shampoo वापरा, केसांची लांबी वाढवा

Pooja Karande-Kadam

Home Made Shampoo :आपल्याला सूट न होणाऱ्या वातावरणात आपण फिरायला गेलो की आरोग्यावर हमखास परिणाम होतो. जिथे जातो तिथल्या वातारवणापासून अन्न, पाणी याचाही परिणाम आपल्या त्वचेवर, केसांवर होतो. अगदी तिथल्या आंघोळीच्या पाण्यानेही त्वचेची वाट लागते.

केवळ बाहेर फिरल्यानेच नाहीतर तुम्ही राहत असलेल्या शहरातील प्रदुषणामुळेही केसांवर इफेक्ट होतो. मऊ, मुलायम, लांबसडक केस कधी पातळ अन् जिर्ण होतात हे कळतही नाही. केसांची अवस्था पाहवत नाही, त्यामुळे आपण पार्लर अन् घरगुती काही प्रयोग करतो. तेव्हा केसांचा उरलेला जीव सुद्धा निघून जातो.

आजकाल केसांच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. काहींना त्यांच्या पांढर्‍या केसांची चिंता असते तर काहींना केस गळण्याची चिंता असते. अशावेळी हा शाम्पू तुमच्यासाठी काम करू शकतो.(Home Made Shampoo :This shampoo made of these 3 things along with fenugreek can improve hair color)

तुम्ही हेअर ट्रिटमेंटसाठी गेलात तर डॉक्टरही आधी विचारतात की तुम्ही शाम्पू कोणता वापरता. याचे कारण म्हणजे केसांना आपण लावत असलेले प्रोडक्ट्स हानिकारक असतात. डॉक्टरही नॅचरल प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला देतात.

म्हणूनच आज आपण घरच्या काही आयुर्वेदिक वस्तूंपासून केसांच्या समस्यांवर औषधी शाम्पू बनवणार आहोत.यासाठी आपल्याला मेथी आवळा रीठा शिकाकाई शाम्पू सारखाच आहे. जाणून घ्या हा शाम्पू बनवण्याच्या 2 पद्धती आणि ते लावण्याचे फायदे.

मेथी आवळा रीठा शिकेकाई शाम्पू कसा बनवायचा

मेथी आवळा रीठा शिकेकाई

तुम्ही मेथी, आवळा, रेठा आणि शिककाईपासून पावडर शॅम्पू तयार करू शकता. तुम्हाला फक्त मेथी आवळा रीठा शिकेकाई हलक्या हाताने भाजून घ्यायची आहे आणि बारीक वाटून घ्यायची आहे. अनेक दिवसांच्या वापरासाठी डब्यातही साठवून ठेऊ शकता.

कसे लावाल - आता जेव्हाही केसांना शाम्पू करावयाचा असेल तेव्हा १ तास आधी ही पावडर कोमट पाण्यात मिसळा. यानंतर या शॅम्पूने केस धुवा. (Hair Care)

मेथी आवळा रीठा शिककाई जेल शाम्पू

तुम्ही मेथी आवळा रीठा शिकाकाई जेल शाम्पू अनेक प्रकारे वापरू शकता. हे जेल बनवण्यासाठी तुम्हाला मेथी, आवळा, रेठा, शिकेकाई हे तिन्ही कोमट पाण्यात भिजवून रात्रभर ठेवावे लागेल. सकाळी ते थोडेसे ज्युसरमध्ये मिसळा. आता पांढरे कापड लावून गाळून घ्या. आता हे जेल थेट केसांना लावा आणि केस धुवा.

मेथी आवळा रीठा शिककाई शाम्पू वापरण्याचे फायदे

मेथी आवळा रीठा शिककाई शाम्पू लावण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, हा शाम्पू प्रथिनांनी समृद्ध आहे आणि म्हणूनच त्याचा वापर केसांच्या मुळांना पोषण देईल आणि त्यांना आतून मजबूत करेल.

दुसरे म्हणजे, त्यात आवळा असतो ज्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि केस काळे होण्यास मदत होते. तिसरे, शिकेकाई टाळू स्वच्छ करते आणि केसांना आतून मजबूत करते.

हे स्प्लिट एंड्स प्रतिबंधित करते आणि रीठा हे एक नैसर्गिक क्लींजर आहे जे केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकते. त्यामुळे या सर्व फायद्यांसाठी तुम्ही हा शॅम्पू वापरावा. (Herbal Shampoo)

केसांसाठी मेथीचा हेअर पॅक

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी दह्यासह मिसळून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावा. एका तास केसांना हे मिश्रण लावून ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस धुवा. हा पॅक तुमच्या गळत्या केसांना रोखण्यासोबतच कोंडा तसेच रफनेसची समस्या दूर करेल.

१० ग्रॅम मेथी बारीक वाटून घ्या आणि त्यात नारळाचे तेल मिसळून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. एका तासानंतर साध्या पाण्याने केस धुवा. हा उपाय तुमच्या गळत्या केसांसाठी रामबाण उपाय म्हणून सिद्ध होऊ शकतो. (Shampoo)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT