Home Remedies Sakal
लाइफस्टाइल

Home Remedies: जर कानात तीव्र वेदना होत असेल तर 'हे' घरगुती उपाय नक्की करा, लगेच मिळेल आराम

Home Remedies: कानात तीव्र वेदना होत असेल तर घरगुती उपाय करू शकता.

पुजा बोनकिले

home remedies how to get rid ear pain follow these tips

कान दुखणे ही एक सामान्य समस्या असली तरी खूप त्रासदायक ठरू शकते. कानात घाण साचल्यामुळे कान दुखण्याची समस्या अनेकदा निर्माण होते. अनेक वेळा कानात काही गेलं तरी वेदना होतात. कान दुखत असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. पण तुम्ही पुढील काही घरगुती उपचार करून वेदना कमी करू शकता.

पुढील घरगुती उपाय करू शकता

  • लसूण

कानात तीव्र वेदना होत असेल तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या वापरू शकता. यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या 2-3 पाकळ्या गरम करून नंतर तेल गाळून घ्यावे. कानात तेलाचे दोन थेंब टाकावे. त्यामुळे कानाला आराम मिळेल.

  • कांद्याचा रस

कांद्याचा रस कानात टाकल्यास होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळतो. यासाठी एक चमचा कांद्याचा रस कोमट करून कानात 2 थेंब टाकावे. असे केल्यास वेदना कमी होतात.

  • कडुलिंबाची पाने

जर तुम्हाला कानदुखीमुळे खूप त्रास होत असेल तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा रस कानात टाकू शकता. यामुळे कान दुखणे आणि संसर्ग या समस्येपासून दूर राहता.

  • आलं

आल्याच्या रसात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून कानात लावल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी आलं बारीक करून त्याचा रस काढा आणि नंतर ते ऑलिव्ह ऑईलमध्ये मिक्स करावे. त्याचे 2-3 थेंब कानात टाका.

  • मीठ

मंद आचेवर मीठ गरम करावे. यामध्ये कापूस टाकावा आणि कानाला लावून ठेवावा. मीठ वेदना कमी करण्यास मदत करते. पण चुकूनही मीठाचे पाणी कानात टाकू नका.

  • कानात तीव्र वेदना का होतात?

सर्दी -खोकला

सर्दी आणि खोकल्यामुळे कान दुखू शकतो. अनेक वेळा कानात जंत किंवा काहीतरी गेल्यावर तीव्र वेदना होतात.

पोहणे

अनेकवेळा पोहताना आणि आंघोळ करताना कानात पाणी जाते, त्यामुळे वेदना देखील वेदना होऊ शकते. ओरल प्रॉब्लेममुळे देखील वेदना होऊ शकतात.

जबड्यात सूज

जबड्यात सूज आल्याने कानात तीव्र वेदना होऊ शकतात. दातांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन हे देखील याचे कारण असू शकते.

वरील उपाय करून देखील वेदना कमी झाल्या नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT