Cleaning Tips: Sakal
लाइफस्टाइल

Cleaning Tips: कपड्यांवर घामामुळे पडलेले पांढरे अन् पिवळे डाग न धुताही काढता येईल, फक्त वापरा 'या' सोप्या गोष्टी

पुजा बोनकिले

Cleaning Tips: उन्हाळा संपला असून पावसाळा सुरू झाला आहे. यामुळे गरमीपासून थंडावा मिळाला आहे. पण अनेक लोकांना पावसाळ्यात देखील घाम येतो आणि कपड्यावर डाग पडतात. तसेच करपड्यांमधून दुर्गंधी देखील येते. कपडे व्यवस्थित धुऊन हे डाग काढता येत असले तरी त्यासाठी बराच वेळ जातो. अनेक वेळा धुतल्यानंतरही डाग कमी होत नाही. यासाठी तुम्ही पुढील हॅक्स वापरून कपड्यांवरील घामाचे डाग न धुता पूर्णपणे काढू शकता.

बेकिंग सोडा

अनेकांच्या घरी बेकिंग सोडा असतो. याचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो. त्याच्या मदतीने कपड्यांवरील घामाचे डाग देखील काढता येतात. यासाठी डाग पडलेल्या भागावर थोडासा बेकिंग सोडा टाका आणि ३० मिनिटे तसाच राहू द्या.नंतर ते ब्रशने हलक्या हाताने घासून कोरड्या कापडाने स्वच्छ करा.

व्हिनेगर स्प्रे

अनेकदा घामाच्या डागांमुळे दुर्गंधी येते. अशावेळी पांढरा व्हिनेगर डाग तसेच दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदेशी आहे. अर्धे पाणी आणि अर्धे पांढरे व्हिनेगर एका स्प्रे बाटलीत मिक्स करा. आता हे द्रावण डागावर स्प्रे करा आणि 10 मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.

कॉर्नस्टार्च

कोणत्याही ऋुतमध्ये कपड्यांवरील घामाचे डाग घालवण्यासाठी कॉर्नस्टार्चचा वापर करू शकता. कारण घामामध्ये तेलही असते आणि कॉर्नस्टार्च तेल शोषून घेते, ज्यामुळे डाग काढणे सोपे होते. त्यामुळे डागावर जाड थर लावून कॉर्नस्टार्च रात्रभर ठेवावे आणि सकाळी ब्रशने कॉर्नस्टार्च काढून टाका.

लिंबाचा रस

लिंबाचा वापर अनेक घरगुती कामासांठी केला जातो. तसेच लिंबू हे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. यामुळे गामाचे डाग कमी करता येतात. यासाठी कपड्यांवर पडलेल्या डागावर लिंबाचा रस लावून १५ मिनिटे ठेवावे.नंतर तंड पाण्याने धुवावे.याचा वापर डार्क रंगाच्या कपड्यांवर करू नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT