Home Remedies: Sakal
लाइफस्टाइल

Home Remedies: मसालेदार पदार्थांच्या सेवनाने पोटात उष्णता वाढलीय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल थंडावा

Home Remedies For Stomach Heat: आहारात मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पोटात जळजळ आणि आग होते. यावर तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता.

पुजा बोनकिले

home remedies to reduce stomach heat

उन्हाळा सुरू झाला असून या दिवसांमध्ये मसालेदार पदार्थ खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. यामुळे पोटात जळजळ आणि आग निर्माण होऊ शकते. तसेच अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. घरगुती उपाय करून पोटातील उष्णता कमी करू शकता.

  • थंड ताक प्यावे

मसालेदार खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड ताक पिऊ शकता. त्यामुळे खाद्यपदार्थ सहज पचण्यास मदत होईल आणि पोटालाही थंडावा मिळेल.

  • विलायची पावडर

मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवत असेल तर तुम्ही जेवणानंतर 2 ते 3 विलायची चावून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही विलायचीचे पाणीही पिऊ शकता. यासाठी विलायची पावडर तयार करून ती पाण्यात टाकून उकळावी. नंतर ते थंड झाल्यावर सेवन करावे.

  • थंड दूध

दूध पिणे शरीरासाठी आरोग्यदायी असते. पोटातील जळजळ किंवा आग कमी करण्यासाठी थंड दूध पिऊ शकता. तसेच मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर पोटातील उष्णता वाढली असेल तर थंड दूध प्यावे.

  • पुदिन्याच्या पानांचा रस

पुदिन्याच्या पानांचा रस प्यायल्यास पोटातील जळजळ कमी होण्यास मदत मिळते. पुदिन्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो, ज्यामुळे पोटातील उष्णता कमी होते. यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून एक ग्लास पाण्यात मिक्स करावी. त्यात लिंबाचा रस टाकावा नंतर त्यात बर्फाचे तुकडे टाकून सेवन करावे. यामुळे पोटातील उष्णता शांत होईल.

  • बडीशेपचे पाणी

बडीशेपचे पाणी देखील पिऊ शकता. याचा पचनसंस्थेवरही चांगला प्रभाव पडतो. यासाठी पाण्यात बडीशेप टाकून चांगले उकळावे आणि नंतर ते थंड करून प्यावे. याशिवाय बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊ शकता आणि सकाळी ते पाणी पिऊ शकता.

  • खडीसाखर

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करायची असेल तर खडीसाखर खाऊ शकता. याशिवाय तुम्ही खडीसाखर दुधात मिक्स करून देखील सेवन करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

K. C. Venugopal : पराभव केवळ काँग्रेसचा नसून महाविकास आघाडीचा...के. सी. वेणुगोपाल : काय झाले ते समजत नाही, पराभवावर विचारमंथन करणार

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

SCROLL FOR NEXT