Toothache Problem sakal
लाइफस्टाइल

Toothache Problem: दातांच्या दुखण्याला करा बाय बाय… हे घरगुती उपाय ट्राय करून बघा

दात दुखीच्या वेदनाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

Aishwarya Musale

बर्‍याच वेळा दातदुखी असह्य होते आणि त्यामुळे रात्री झोप देखील येत नाही, रोजच्या दिनचर्येवरही नकारात्मक परिणाम होतो. तुम्ही वेदनांकडे दुर्लक्ष करू नये कारण यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही दातदुखीपासून आराम मिळवू शकता.

दातदुखीपासून मुक्त कसे व्हावे?

1. मीठ आणि लवंग

सर्वप्रथम लवंगाच्या काही कळ्या बारीक करून घ्या आणि नंतर त्यात मीठ मिसळा. आता हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी दुखणाऱ्या दातांवर लावा. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, तेव्हा वेदना निघून गेलेली असेल.

2. हळद आणि मीठ

एका लहान भांड्यात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट दातांवर लावा. हळूहळू असह्य वेदना निघून जातील.

3. कडुलिंबाची पाने

कडुलिंबाची पाने बारीक करून त्याचा रस काढा आणि गुळण्या करा. यामुळे वेदना निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतील ज्यामुळे दातदुखी कमी होईल.

4. कांद्याचे तुकडे

कांद्याचा वापर सामान्यतः अनेक रेसेपीजमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की तो दातांसाठी देखील फायदेशीर आहे.

5. लिंबाचा रस

लिंबाचा रस हा दात खराब करणाऱ्या बॅक्टेरियाचा शत्रू आहे. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या, आता त्या पाण्याने गुळण्या केल्यास दातदुखीपासून आराम मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

Video: “कोण आहेत हे, यांचं नाव घेऊन ठेवा”; मविआच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले

Yuvraj Singh, मोहम्मद कैफसह तेंडुलकरही आयपीएल लिलावात उतरणार; जाणून घ्या किती आहे मूळ किंमत ?

SCROLL FOR NEXT