आता गर्मीने आणि पावसाने वातावरण बदलत आहे. हळूहळू थंडी पडणार आहे. कधी अतिउष्णता, कधी अचानक पाऊस तर कधी कडक उन्हामुळे वातावरणात संसर्ग पसरतो. त्यामुळे सगळ्यात आधी लोकांना सर्दी आणि तापाचा त्रास होऊ लागतो.
ही एक सामान्य गोष्ट आहे. बदलत्या ऋतूमध्ये प्रत्येकाला कधी ना कधी मौसमी विषाणूजन्य संसर्ग होतो. कारण बदलत्या हवामानाचा सर्वात आधी आपल्या शरीरावर परिणाम होतो.
जेव्हा हवामानानुसार शरीराचे तापमान वारंवार बदलू लागते, तेव्हा व्यक्ती आजारी पडते, म्हणजेच त्याला सर्दी, खोकला आणि तापाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आजकाल व्हायरल फीव्हर खूप पसरला आहे. सीझनल फ्लूची समस्या टाळण्यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत तर घेत असालच, परंतु येथे सांगितलेल्या काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही व्हायरल फीव्हरच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
1. घर स्वच्छ ठेवा
जर तुम्हाला अनेक दिवसांपासून व्हायरल फीव्हर आणि सर्दी होत असेल तर सर्वप्रथम स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपले घर स्वच्छ ठेवा. पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचू देऊ नका. यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांपासून तुमचा बचाव होईल.
2. बाहेरच्या वस्तू खाऊ नका
अनेकदा लोक पावसाळ्यात बाहेरचे अन्न जास्त खातात. स्ट्रीट फूडच्या सेवनामुळे शरीरात विविध आजार होतात. त्यामुळे बदलत्या ऋतूंमध्ये असे अन्न खाणे टाळावे. बाजारात किंवा उघड्यावर तयार केलेल्या वस्तू खाणे टाळा. कारण त्यामुळे संसर्ग पसरू शकतो.
3. असे पाणी प्या
व्हायरल फीव्हरपासून लवकर आराम मिळवायचा असेल तर नॉर्मल पाणी पिण्याऐवजी पाण्यात तुळस आणि दालचिनी मिसळून प्या. हे दोन्ही त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हे दोन्ही पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल आणि ताप पुन्हा येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.