‘टेरेस फार्मिंग/ किचन गार्डनिंग व बायो एन्झाईम प्रक्रिया तंत्रज्ञान’ या विषयावर भानुदासराव चव्हाण सभागृहामध्ये एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. वुई फॉर एन्व्हायरमेंट, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स तसेच देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड मँनेजमेंट यांच्या वतीने उपक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कॉलेजचे प्राचार्य उल्हास शिंदे होते. प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तज्ज्ञांनी बागकाम हे मानसिक शांती व समाधानासाठी किती आवश्यक आहे याकडे लक्ष वेधले.
दैनंदिन जीवनामध्ये आणि गच्चीवरील बागेमध्ये बायोएंझाइम व त्याचा वापर याविषयी दीपक मोताळे (नांदेड) यांनी मार्गदर्शन केले. गच्चीवरील बाग काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय आणि व्यवस्थापनासाठी जीवामृत आणि नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व या विषयावर तुषार देसाई (मुंबई) यांनी माहिती दिली.
‘‘शहरातील गर्दीतील प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना तणावमुक्त जीवनशैलीची गरज आहे यावर गच्चीवरील बागकाम हा एक उत्तम पर्याय आहे’’, असे ठोंबरे म्हणाले. ‘‘घरातील कचऱ्यापासून खत तयार करता येते.
यातून आपण घरच्या घरी निर्माण होणारा ताजा आणि विषमुक्त भाजीपाला, फुले, फळ याचे उत्पादन करू शकतो’’, असे शिंदे म्हणाले. यावेळी डॉ. गणेश कुलकर्णी लिखित ‘गच्चीवरील बागेचे महत्त्व व शहरी जीवनासाठी एक वरदान’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष मेघना बडजाते, कमल पहाडे उपस्थित होत्या. डॉ. वर्षा फाळके यांनी सूत्रसंचालन केले. संजय आंबेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.