Orange  sakal
लाइफस्टाइल

Orange Peel Face Pack: संत्र खाऊन साल फेकू नका, चमकदार त्वचेसाठी असा करा संत्र्याचा वापर

संत्र्याची साल तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Aishwarya Musale

संत्र्याची चव गोड आणि आंबट असते. हे फळ खूप रसाळ आहे. संत्र्याचा रस नियमितपणे पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम असते.

संत्र्याचा आरोग्याच्या फायद्यांव्यतिरिक्त, अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत. बरेच लोक खाल्ल्यानंतर संत्र्याची साले फेकतात. ते त्वचेसाठी वापरले जाऊ शकते. संत्र्याची साल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

सध्या सर्वांना काळजी असते ती म्हणजे त्वचा कशी मुलायम राहील याची. आज यासाठीच आपण एका घरगुती उपयाबद्दल जाणून घेणार आहोत. 

संत्र्याच्या सालीपासून आपण एक घरगुती फेस पॅक बनवू शकतो. हा लेप त्वचेवर लावल्यावर तुमची त्वचा चांगली मुलायम पडेल. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील डाग, ब्लॅकहेड्स, फोडी कमी होण्यासही मदत होते.

हा लेप व्हिटॅमिन सी ने समृद्ध असून ते त्वचा स्वच्छ करण्यासही मदत करते. तसेच  त्यात चेहऱ्यावरील मुरुम कमी करणारे आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील आहेत. आपण काही सोप्या टिप्स आणि घटकांसह आपला चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवू शकता.

चला तर मग संत्राच्या सालाचा फेस पॅक कसा बनवायचा त्याची कृती आपण पाहूया. फेस पॅक बनवण्यासाठी पहिल्यांदा 2-3 संत्री घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून एक आठवढाभर त्याला वाळवून घ्यावे. त्यानंतर त्या सालींची बारीक पूड करून घ्यावी. 

फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य; 


एक चमचा तांदळाची पूड, एक चमचा तयार केलेली संत्र्याची पूड, संत्र्याचा ज्यूस, दूध

फेस पॅक तयार कसा करायचा 


संत्र्याच्या सालीपासून घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी पहिल्यांदा एका बाऊलमध्ये एक चमचा तांदळाची पूड आणि एक चमचा आपण तयार केलेली संत्र्याची पूड एकत्र घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये संत्र्याचा ज्यूस टाका.

जर संत्र्याचा ज्यूस उपलब्ध नसेल, तर लिंबाचा ज्यूस टाकला तरी चालेल. यानंतर त्यात फेस पॅक बनण्याजोगे दूध घालावे आणि ते मिश्रण करून घ्यावे. 

तयार झालेले मिश्रण नंतर त्वचेवर लाऊन घ्यावे. मिश्रण लावल्यावर त्याला 2 तास वाळू द्यावे. हा लेप वाळल्यानंतर ते धूवून घ्यावे. यामूळे आपली त्वचा मुलायम पडेल. जर अशा पध्दतीने हा फेस पॅक तयार करून आठवड्यातून 2-3 वेळेस  लावला तर तूमची त्वचा चांगली उजळू शकते.

हा लेप त्वचेवर लावल्यावर तुमची त्वचा चांगली मुलायम पडेल. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील डाग, ब्लॅकहेड्स, फोडी कमी होण्यासही मदत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT