albert Einstein and honey bee esakal
लाइफस्टाइल

Honey Bee Day 2023 : ‘मधमाशी संपली की संपूर्ण मानव जात नष्ट होणार’ असं अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी का म्हटल होतं?

मधमाशांची संख्या गेल्या काही झपाट्याने कमी होत आहे

Pooja Karande-Kadam

Honey Bee Day 2023 : मधमाशी आपल्या काय कामाची, ती तर फक्त मध देते आणि दिसेल त्याला चावते एवढच काम तिचं. असंच मत काहीजणांच असेल. पण तस नाहीय. मधमाशी आहे म्हणून आपण आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. मधमाशीच्या बाबतीत एक भविष्यवाणी थोर संशोधक अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी केली आहे.

अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या मते, मधमाशा गायब झाल्या तर मानव टिकू शकणार नाही. असे विचार त्यांनी व्यक्त केले होते. परंतु हा दावा सिद्ध करणारा कुठलाही पुरावा अद्याप सिद्ध झालेला नाही. काही शास्त्रज्ञ मात्र आइन्स्टाइनच्या या विचारामागचं कारण समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आइन्स्टाइन यांनी केलेल्या संशोधनानुसार मधमाशी परागीभवन करते. त्यामुळे आपल्या शेतात पिकं येत. आपण दोनवेळंच जेवू शकतो. पण जर मधमाशी जगातून नष्ट झाली आणि पृथ्वीवर होणारे परागीभवन थांबले तर चारच वर्षात मानवही नष्ट होतील.

मधमाशी हा पर्यावरणातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार मधमाशांची संख्या गेल्या काही झपाट्याने कमी होत आहे. जवळपास ९० टक्के मधमाशा मानशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढ, जंगलतोड, मधमाश्यांसाठी सुरक्षित जागेचा अभाव, फुलांचा अभाव, पिकांवर होणारा कीटकनाशकांचा वापर, रसायनांमुळे मातीमध्ये होणारे बदल आणि फोनमधून निघणारे तरंग यामुळे मधमाशांची संख्या कमी होत चालली आहे.

वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीसाठी निसर्गाने फुलांची योजना केली आहे. फुले ही पुनरुत्पत्तीसाठी उपयुक्त अशा अनेक घटकांची बनलेली असतात. उदा. फुलातील परागदांडे व त्यावरील पराग निर्माण करणारे परागकोश, बीजांड आणि बीजांडनलिका व स्त्रीलिंगी भाग एकाच फुलात असतात. अशा फुलांना द्विलिंगी फुले म्हणतात.

काही प्रकारामध्ये वनस्पतीत उदा. भोपळा, कलिंगड, पपई इ. मध्ये पुल्लिंगी फुले आणि स्त्रीलिंगी फुले वेगवेगळी असतात. फुलांवरील पुंकेसर बीजांड नलिकेवरील कळीवर नेऊन पोचविणे याला परागीभवन म्हणतात.

परपरागीभवन करणारे अनेक कीटक, पक्षी आणि प्राणी यांमध्ये मधमाशा या सर्वांत जास्त कार्यक्षम आणि खात्रीचे पर परागसिंचन करणाऱ्या समजल्या जातात. याचे मुख्य कारण म्हणजे मकरंद व पराग हेच केवळ मधमाश्‍यांचे खाद्य असते. 

आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अाणि पुनरुत्पत्ती करण्यासाठी त्यांना दररोज मकरंद व पराग गोळा करावा लागतो. या पराग गोळा करण्याच्या क्रियेत वनस्पतींमध्ये परागीभवन होऊन बीजधारणा होते. 

मधमाशी इकडून तिकडे फुलांवर बागडते म्हणूनच आपण दोन वेळ जेऊ शकतो?

मधमाश्‍या या सामूहिक जीवन जगणाऱ्या आहेत. एका वसाहतीत १० ते १५ हजार मधमाश्‍या असतात. पुढे त्या वाढून ३० ते ४० हजारापर्यंत पोचतात.

मधमाशा त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात. एकाच प्रकारच्या वनस्पतीवरील मकरंद गोळा करताना त्यांच्या अंगावरील पायांवरील केसामुळे त्यावर हजारो परागकण चिकटतात त्यामुळे परपरागीभवन होण्याची १०० टक्के खात्री असते. 

भुंगे, कुंभारीण माशा यांसारख्या माश्‍यांतर्फेही पर पराग सिंचन होते; परंतु त्यांची अपुरी संख्या सातत्याचा अभाव वर्षातील काही विशिष्ट ऋतुतच त्यांचे अस्तित्व असणे त्यामुळे त्यांच्याद्वारे खात्रीने परागसिंचन होत नाही. 

कीटकनाशकांचा वापर वाढत चालला अाहे त्यामुळे कीटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पेटीतील मधमाशीपालनामुळे परागीभवनासाठी मधमाशा या उत्तम स्रोत अाहेत. कितीही उत्तम जातीचे बियाणे वापरले किंवा उत्तम व्यवस्थापन केले तरी पिके, फुलावर आल्यानंतर परागसिंचन झाले नाही.

तर करणारे कीटक उपलब्ध नसतील तर फुले वांझ राहून सुधारित बियाणांपासून ते नंतर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते. मधमाशांच्या वसाहतीमुळे फुललेल्या बहुतेक सर्व फुलांमध्ये परपरागीभवन होऊन पिकाचे एकरी उत्पादन ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते असे संशोधनाअंती दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT