Honeymoon Destinations esakal
लाइफस्टाइल

Honeymoon Destinations: नोव्हेंबरमध्ये हनिमूनला जाण्यासाठीची सर्वोत्तम ठिकाणे कोणती?

या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्येच अनेक विवाह सोहळ्याच्या तिथी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Honeymoon In Winter's: आता काही दिवसांनी लग्नाचा सीझन सुरू होणार आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्येच अनेक विवाह सोहळ्याच्या तिथी आहेत. त्यामुळे नविन लग्न झालेली जोडपी रोमँटिक हवामानात हनिमूनला जाण्यासाठी रोमँटिक ठिकाणे शोधतात, कारण हेच क्षण पुढे त्यांच्या आयुष्यातील सुंदर आठवणीच्या स्वरूपात राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आपल्या भारतातील अशा काही अद्भुत ठिकाणांबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, जे ठिकाणे तुम्हाला हिवाळ्यात तुमच्या जोडीदारासोबत हनिमून एन्जॉय करण्यासाठी अगदी उत्तम डेस्टिनेशन ठरू शकतील.

Mussoorie

मसूरी-डेहराडून (Mussoorie)

मसूरी हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या डेहरादून जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. डेहरादून शहरापासून 35 किमी अंतरावर आहे. हे शहर अनेक दशकांपासून थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांची पसंती असते तिथल्या डोंगररांगांमध्ये मनसोक्त भटकंती झाल्यानंतर केम्टी धबधबा,कंपनी गार्डन,मसुरी तलाव ही ठिकाणं बघायची मॉल रोडला खरेदी करायची असा कार्यक्रम पर्यटक आखत असतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून मसुरीला विशेष महत्त्व आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडून पासून 28 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरांच्या रांगेत मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत. तुम्हाला तुमच्या हनिमूनचा प्रत्येक क्षण खूप सुंदर आणि अविस्मरणीय बनवायचा असेल, तर नोव्हेंबर महिन्यात तुमच्या जोडीदारासोबत मसुरीला जाण्याचा प्लॅन करा. इथल्या रस्त्यावरून हिंडणे आणि जुन्या दुकानातल्या स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेणे ही देखील एक मजा आहे.

Ooty Hill Station

ऊटी ( Ooty Hill Station)

ऊटी, जगातील प्रसिद्ध तामिळनाडू शहर हनीमूनसाठी सर्वात योग्य ठिकाण आहे. त्याला पर्वतांची राणी म्हणतात.उधगमंडलम किंवा ऊटी हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी जॉन सुलिवान यांचे योगदान मानले जाते. ऊटी हा पूर्वी टोंगा आदिवासींचा गढ  होता. ब्रिटीश भारतात आल्यावर त्यांनी ऊटीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. येथे ब्रिटीश राजवटीतील बरीच सुंदर बांधकामे अतिथींगृहाच्या रूपाने आपले स्वागत करताना दिसतील.येथे हिरवीगार पालवी, चहाची बाग, दूरदूरपर्यंत पसरलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती बघायला आपल्याला नक्कीच आवडेल. ऊटीमध्ये नीलगिरी पर्वतरांगांचा समावेश आहे. डोंगरावरील पर्वत, खोरे आणि पठाराचे विहंगम दृश्य खूप सुंदर अनुभव आहे. येथे हे मनोहर दृश्य बघण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था देखील केली आहे. हिवाळ्यात जोडीदारासोबत उटीला जाण्याचा प्लॅन करता येईल. ऊटीला 'टेकडीची राणी' म्हणून ओळखले जाते. असं म्हणतात की इथे येऊन जोडपी आणखी रोमँटिक होतात आणि इथून निघताना खूप सुंदर आठवणी घेऊन परततात.

Kashmir

कश्मीर की बर्फीली वादियां ( Kashmir)

काश्मीर हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला वर्षभरात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. भव्य ट्यूलिप गार्डन्ससाठी पूर्ण बहरण्यासाठी मार्च आणि एप्रिल उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये सर्वोत्तम वेळ आहे. काश्मीरमध्ये सर्वत्र हिरवीगार भूमी आहे, उंच पर्वत मुख्यतः बर्फाने आच्छादलेले आहेत आणि निसर्गाच्या इतर अद्भुत सौंदर्याचा आनंद घेता येतो. पर्वतांच्या बर्फ आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हे महिने सर्वोत्तम आहेत. आपण या काळात अल्पाइन कुरण देखील पाहू शकता. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे. काश्मीरच्या बर्फाच्छादित दऱ्या तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला अधिक रोमँटिक वातावरण देतील. हनिमूनसाठी हे सर्वोत्तम डेस्टिनेशन आहे.

Andaman and Nicobar Islands

अंदमान  निकोबार आईलैंड (Andaman and Nicobar Islands)

अंदमान आणि निकोबार बेट 'रोमँटिक आयलंड' म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत विविध उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. जसे स्कुबा डायव्हिंग, बोट रायडिंग आणि पोहणे. येथे भेट देण्यासाठी खूप चांगली ठिकाणे आहेत.

Udaipur

उदयपुर (Udaipur)

हिवाळ्यात हनिमूनसाठी उदयपूर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. उदयपूरमधील लेक पिचोला येथे तुमच्या जोडीदारासोबत सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहणे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हॉट एअर बलून राईडचा आनंद घेऊ शकता. याशिवाय येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.

Goa

गोवा (Goa)

निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे.

येथे आलिशान रिसॉर्ट्स, समुद्रकिनारे आणि अप्रतिम खाद्यपदार्थ आहेत. इथली संध्याकाळ खूप खास असते. येथे स्कूबा डायव्हिंग, फिशिंग, पॅरासेलिंग, जेट स्की आणि पोहणे यासारख्या मजेदार क्रियाकलापांचा पुरेपूर लाभ घेता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT