Wed in India eSakal
लाइफस्टाइल

Wed in India : 'वेड इन इंडिया' साठी सज्ज झाल्या देशभरातील हॉटेल चेन्स.. हयात, हिल्टन, टाटाने लाँच केले नवे पॅकेजेस!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यातील मन की बात कार्यक्रमात लोकांना 'वेड इन इंडिया', म्हणजेच विदेशाऐवजी भारतातच लग्न सोहळे आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं.

Sudesh

Indian Hotel Chains Wedding Season : सध्या देशभरात लग्नसराईला पुन्हा सुरुवात झाली आहे. भारतातील ग्रँड वेडिंग्स या संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी केवळ वेडिंग सीझनमधून देशात कोट्यवधींची उलाढाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जगभरातील लोकांना असं आवाहन केलं आहे, की त्यांनी भारतात येऊन लग्न करावं. यातूनच नफा मिळवण्यासाठी आता देशातील हॉटेल चेन्स सज्ज झाल्या आहेत.

मोठ्या लग्न सोहळ्यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने गेल्या वर्षी एक अभियान राबवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोव्हेंबर महिन्यातील मन की बात कार्यक्रमात लोकांना 'वेड इन इंडिया', म्हणजेच विदेशाऐवजी भारतातच लग्न सोहळे आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

इकॉनॉमिक टाईम्सने विविध हॉटेल्सच्या अधिकाऱ्यांशी बोलून याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टाटा, हिल्टन, हयात, रॅडिसन अशा कित्येक मोठ्या हॉटेल चेन्सनी खास वेडिंग सीझनसाठी नवीन पॅकेजेस लाँच केले आहेत. सध्या युनिक आणि ऑफ-बीट वेडिंगचा ट्रेंड वाढत असल्यामुळे, त्या दृष्टीने सेवा पुरवण्याचा या हॉटेल्सचं उद्दिष्ट आहे.

टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (IHCL) आपल्या पोर्टफोलिओमध्ये लग्नासाठी ट्रॅडिशनल आणि युनिक अशा लोकेशन्स जोडल्या आहेत. कंपनीच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे एक्झिक्युटिव्ह व्हॉईस प्रेसिडेंट प्रवीण चंदेर कुमार यांनी याबाबत माहिती दिली. रॅडिसन हॉटेल ग्रुपचे सल्लागार के.बी. कचरू यांनी सांगितलं, की विवाह सोहळ्यासाठी सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी त्यांनी एक डेडिकेटेड वेडिंग कन्सेप्ट तयार केली आहे.

हिल्टनने देखील लग्नासाठी "वेडिंग डायरीज बाय हिल्टन" इनिशिएटिव्ह लाँच केलं आहे. हिल्टन इंडियाचे कमर्शिअल डिरेक्टर मनीष तोलानी यांनी सांगितलं, की "पर्यावरणपूरक वेडिंग सोहळ्यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या वेडिंग प्लॅनमध्ये ग्राहकांना अधिकाधिक पर्सनलाईज्ड अनुभव मिळणार आहे. यामध्ये सेलिब्रिटी शेफच्या माध्यमातून आम्ही फूड अँड बेव्हरेज विभागही एक्स्पांड करणार आहोत."

ग्रँड हयात

ग्रँड हयात हॉटेलने याच आठवड्यात "Perfectly Yours 2.0" या पॅकेजची घोषणा केली. 2019 सालापासून हयातमधील वेडिंग बिझनेसमध्ये 200 टक्के वाढ झाली आहे, तर 2022 पासून ही वाढ 50 टक्के झाली असल्याची माहिती हयातच्या रीजनल कमर्शिअल व्हॉईस प्रेसिडेंट कदंबिनी मित्तल यांनी दिली.

मॉडर्न कपल्सना जे अपेक्षित आहे, ते देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. केवळ लग्नाचा दिवसच नाही; तर संगीत, मेहंदी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवरही आमचा भर आहे, असंही मित्तल यांनी स्पष्ट केलं.

रॅडिसन ब्लू

उदयपूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेल तर कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नामुळे आधीच प्रसिद्ध झालं आहे. आपल्या वेडिंग प्लॅनिंगची माहिती देण्यासाठी ते सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मदत घेत आहेत. भारताबाहेरील लोकांनीही येथे येऊन लग्न करावं यासाठी हे प्रयत्न करत आहेत.

अशाच प्रकारे विंधम हॉटेल्स अँड रेसॉर्टने 'अ मूमेंट टू रिमेंबर' कॅम्पेन लाँच केलं आहे. इस्पायर हॉस्पिटॅलिटी ग्रुपने देशातील हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये डेडिकेटेड वेडिंग टीम्स तैनात केल्या आहेत. बंगळुरूमधील लीला पॅलेस हॉटेल हे लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी खास 10,000 स्क्वेअर मीटर मोठी महाराजा बॉलरूम लाँच करत आहे. याच शहरातील गोपालन मॉलमध्ये असणारं ग्रँड मर्क्यूर हेदेखील ऑल-इन्क्लुझिव्ह वेडिंग पॅक्स लाँच करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT