TV Fridge Sakal.jpg 
लाइफस्टाइल

गृहोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार; जाणून घ्या काय आहेत कारणं?

पुढील तिमाहीत विविध कंपन्यांच्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (Consumer Durables) किंमती नव्या वर्षात पाच ते दहा टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळं तुम्ही जर फ्रीज, वॉशिंग मशिन, एअर कंडिशन किंवा तर इलेक्ट्रॉनिक वस्तू (Electronics Items) घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवसांत या वस्तू महागण्याची शक्यता आहे. या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्यामागे काय कारणं आहेत तसेच कधीपासून ही किंमतवाढ होईल याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (Household prices will rise in new year Know what are the reasons)

कधीपासून होईल किंमतीत वाढ?

पॅनासोनिक (Panasonic), एलजी (LG), हायर (Haier) या कंपन्यांनी आपल्या गृहोपयोगी वस्तूंच्या किंमतीत बदल केला असून यामध्ये वाढ केली आहे. तर इतर प्रसिद्ध कंपन्या जसं सोनी (Sony), हिताची (Hitachi), गोदरेज (Godrej) या कंपन्या आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवण्याबाबत या तिमाहीच्या शेवटापर्यंत निर्णय घेऊ शकतात.

वस्तूंच्या किंमतीत किती टक्के होणार वाढ?

कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अल्पायन्सेस मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (CEAMA) माहितीनुसार, या क्षेत्रामध्ये वस्तूंच्या किंमतीत जानेवारी ते मार्च महिन्यांपर्यंत वाढ होणार आहे. ही वाढ पाच ते सात टक्क्यांपर्यंत होऊ शकते, असा अंदाजही या संघटनेनं व्यक्त केला आहे.

किंमती वाढण्याचं कारण काय?

"वस्तूंची किंमत, जागतिक मालवाहतूक आणि कच्चा मालाच्या किंमतीत अभूतपूर्व वाढ झाल्यानं आम्ही आमच्या टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन आणि एअर कंडिशन प्रकारातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती तीन ते पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतिश एन. एस. यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

पॅनासोनिक कंपनीनं आधीच आपल्या वस्तूंच्या किंमती ८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यामागचं कारण सांगताना पॅनासोनिक इंडिया प्रादेशिक संचालकांनी सांगितलं की, "कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढ आणि वितरण व्यवस्थेतील दरवाढ यांमुळं आम्ही आमच्या एअर कंडिशनच्या किंमतीत ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर येत्या काळात आम्ही आमच्या इतर होम अप्लायन्सेसच्या किंमतीही वाढवणार आहोत"

साऊथ कोरियाची महत्वाची कंपनी असलेल्या एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे उपाध्यक्ष दीपक बन्सल यांनी म्हटलं की, "आम्ही आमच्या होम अप्लायन्सेस प्रकारातील वस्तूंच्या किंमती वाढवल्या आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत सातत्यानं होत असलेली वाढ आणि वाहतुकीचा खर्च या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT