Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, रोज मिळते पनिशमेंट, तर या ट्रिक्स वापरा, मुलं होतील अभ्यासात तरबेज!

Develop your child interest in studies :  मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे गणित काही जुळेना, पालक झालेत चिंताग्रस्त, Don’t Worry इतकाच बदल करा अन् फरक अनुभवा

सकाळ डिजिटल टीम

Easy Way To Make Your Child Interested In Studying :

सुट्ट्या संपून आता मुलांचं शाळेचं रूटीन बसलेलं आहे. शाळेत जाण्याची अन् टिफिन बनवण्याची आईची रोजची गडबड सुरू असेल. पण, शाळेला जाताना प्रत्येक आई रोज एक प्रश्न मुलाला विचारते. तो म्हणजे होमवर्क केला आहेस का? त्यावर मुलगा म्हणतो नाही ग आई, लक्षात नाही राहीलं.

तर, अनेकवेळा असं होत आहे की, मुलांना होमवर्क न केल्याने शाळेत रोज शिक्षा केली जात आहे. काहींना वर्गाबाहेर उभं केलं जात आहे, तर काही विद्यार्थी रोजच अंगठे पकडून उभे राहतात. याच्या तक्रारीही पालकांकडे जात असतील. मात्र, मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी हे याचं गणित काही पालकांना जुळत नाहीय.  

मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी, त्यांनी स्वत:हून अभ्यासाचा विचार, सतत काहीतरी शिकण्याचा विचार कसा करावा यासाठी काही गोष्टी पालकांनीही करायला हव्या आहेत.कारण, सतत मुलं जर अभ्यासात कमी पडत असेल तर पालकांना त्याचं टेंन्शन असतं. या टिप्समुळे पालकांचा मनस्ताप कमी होईल. आणि तुमची मुलंही अभ्यास आवडीने करू लागतील.

मुलांचे रूटीन ठरवा

तुम्ही उठल्यापासून काय-काय करणार आहात. कितीवेळ झोप, कितीवेळ शाळा, खेळ अन् कितीवेळ अभ्यास हे मुलांच रूटीन पालकांनी फिक्स करायला हवं. शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच हे रूटीन सेट केलं तर मुलांना त्याची सवय होते. त्यामुळे, मुलंही शाळेतून आलं की खेळून अभ्यासाला बसतात. त्यांना प्रत्येकवेळी अभ्यासाची आठवण नाही करून द्यावी लागत.

मुलांना वेळ द्या

मुलांच्या जन्मानंतर जशी त्यांना पालकांची गरज असते. खाणे,पिणे चालणे, बोलणे या वाढीत पालक मुलांची मदत करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, मुलांना अभ्यासातही तुमची मदत लागते. कारण, पालकांनी मुलांना फक्त अभ्यास करा असे सांगून उपयोग नाही. तर, त्यांनी स्वत: त्यासाठी वेळ काढावा लागेल. तर मुलं आवडीने अभ्यास करतील.  

मुलांवर दबाव टाकू नका

सर्वांच्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांवरही परीक्षा आणि अभ्यासाचा तणाव असेल. तर पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये. काही पालक मुलांना शिक्षा करतात, उपाशी ठेवतात. पण जितके गोड बोलून त्यांच्याकडून अभ्यास करून घ्याल, तितका मुलंही मन लावून अभ्यास करतील.

 

मुलांना उदाहरणं देऊन सांगा

आपल्याला आपल्याशी संबंधित अनेक गोष्टी लक्षात राहतात. पण, तुम्हाला माहिती आहे का? अभ्यास लक्षात ठेवण्याची ही प्रभावी पद्धत आहे. तुम्ही मुलांना शिकवताना त्यांना गोष्टी, अनुभव आणि उदाहरणे देत शिकवत असाल तर त्यांना त्या गोष्टी नेहमी लक्षात राहतील.

मुलांना खेळातून ज्ञान द्या

मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यामुळे प्ले-ग्रूप, नर्सरीसारख्या शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांना खेळातून कलर, आकडे, वस्तू यांचे ज्ञान दिले जाते. कारण, त्यांना खेळणं आवडतं. तस, तुम्हीही तुमच्या मुलांना खेळातून, आकडे, कलरफुल गेम्स यातून गोष्टी शिकवू शकता. विज्ञान, गणितसारखे विषय मुलं गेम्समधून अधिक प्रभावीपणे शिकू शकतात.

मुलांना अभ्यासासोबत सामान्य ज्ञानही द्या

तुम्ही काहीवेळा पाहिलं असेल की, नात्यातील मुलं फक्त अभ्यासू किडे असतात. ज्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असतं. पण, अशा मुलांना ‘जनरल नॉलेज’ नसतं. तुमचा मुलगा कशातही कमी रहायला नको असेल तर त्याला बाहेरील ज्ञानही द्या. तुम्ही त्यांना टीव्हीवर लागणारे प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम दाखवू शकता. सामान्य ज्ञान असलेली पुस्तके देऊ शकता. हे ज्ञान त्यांना जीवनभर कामी येणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT