Zika Virus Sakal
लाइफस्टाइल

Zika Virus: गर्भवती महिलांना झिकाची लागण कशी होते अन् गर्भावर कोणता परिणाम होतो? वाचा डॉक्टर काय सांगतात

Zika Virus: डॉक्टरांच्या मते संक्रमित डास चावल्याने किंवा झिका पॉझिटिव्ह व्यक्तीच्या लैंगिक संपर्कामुळे झिका व्हायरसची लागण होऊ शकते.

पुजा बोनकिले

Zika Virus: दिवसेंदिवस देशात झिकाचा प्रदुर्भाव वाढत आहे. पुणे शहरातील झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून, त्यामध्ये १० गर्भवती मातांचा समावेश आहेत. त्यामुळे राज्यभरात या व्हायरसबाबत आरोग्य यंत्रणा अलर्ट आहे. झिका प्रभावित गर्भवती आईकडून नवजात बाळाला झिका विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाळाच्या अविकसित मेंदूवर थेट हल्ला होण्याची भिती असते. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात.

डॉक्टरांच्या मते, गर्भवती महिलांना झिका होऊ शकतो. संक्रमित डास चावल्याने किंवा झिका पॉझिटिव्ह व्यक्तीच्या लैंगिक संपर्कामुळे झिका व्हायरसची लागण होऊ शकते. संक्रमणाचे इतर दुर्मिळ मार्ग म्हणजे रक्त किंवा रक्त उत्पादने, रक्तसंक्रमण, अवयव प्रत्यारोपण इत्यादी आहेत. गर्भावस्थेत झिकाचा परिणाम आईवर आणि गर्भावरही होतो.

गर्भाला हे जन्मजात विसंगती जसे की मायक्रोसेफली (मेंदूच्या वाढीस अडथळा) आणि इंट्राक्रॅनियल कॅल्सीफिकेशन (मेंदूमध्ये कॅल्शियमचे साठे ज्यामुळे फोकल डेफिसिट किंवा फेफरे होऊ शकतात) किंवा गर्भाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

गर्भवती महिलांनी जी काळजी घ्यावी ती इतर लोकांसारखीच असते. परंतु त्यांना अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. कारण स्वतः आईला होणारा आजार हा बहुतांशी सौम्य असेल परंतु त्याचा गर्भावर गंभीर विपरीत परिणाम होऊ शकतो.

डासांपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: दिवसा चावणाऱ्या डासांपासून बचाव करण्यासाठी लांब बाही किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत, मच्छर प्रतिबंधक लागू करावे, डासांचा प्रवेश रोखण्यासाठी घरे आणि कार्यालयांची तपासणी करावी, कुंडीतील झाडे किंवा कंटेनरमध्ये पाणी साचणे टाळावे. झिका संसर्ग झालेल्या किंवा अलीकडेच झिका संसर्गातून बरे झालेल्या लोकांशी घनिष्ठ शारीरिक संपर्क टाळावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.

डॉ. पृथु ढेकणे सल्लागार - संसर्गजन्य रोग मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे

‘झिका’ची लक्षणे

ताप येणे

डोळे लाल होणे आणि सुजणे

डोकेदुखी

पायांचे गुडघे दुखणे

शरीरावर लाल चट्टे येणे

शरीरावर पुरळ येणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

Kolhapur Result : हसन मुश्रीफ, आबिटकरांचे मंत्रिपद निश्‍चित; अमल महाडिक, राजेश क्षीरसागरांनाही 'लॉटरी' शक्य

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT