National Sprinkle Day Sakal
लाइफस्टाइल

National Sprinkle Day: 'या' खास पद्धतीने घरीच साजरा करा 'स्प्रिंकल्स डे'

पुजा बोनकिले

National Sprinkle Day 2024: दरवर्षी राष्ट्रीय स्प्रिंकल्स दिवस 23 जुलै रोजी साजरा केला जातो. नावाप्रमाणेच, हा दिवस खरोखरच स्प्रिंकल्स साखरेच्या रंगीबेरंगी दाण्यांच्या अस्तित्वामुळे मिळणारा आनंद साजरा करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. जगभरातील बऱ्याच गोष्टींसाठी रंगीत स्प्रिंकल्सचा वापर केला जातो. आइस्क्रीम, कपकेक यासारख्या पदार्थांवर टॉपिंग म्हणून वापर केला जातो. हा दिवस तुम्ही घरीच पुढी पद्धतीने साजरा करू शकता.

स्प्रिंकल डे कसा साजरा करावा

मित्रांना एकत्र करा आणि स्प्रिंकलचे विविध प्रकार आणू शकता. त्यापासू इंद्रधनुष्य तयार करू शकता. प्रत्येकजण त्यांच्या आवडीचे गोड दाणे म्हणजेच स्प्रिंकलचा आस्वाद घेईल.

प्लेन कुकीज किंवा कपकेक घेऊन त्याला स्प्रिंकलने सजवण्याची स्पर्धा आयोजित करू शकता. जो विजेता असेल त्याला छान भेटवस्तू द्या. यामुळे हा दिवस अधिक खास बनेल.

स्प्रिंकलचा वापर करून विविध पदार्थ बनवू शकता. यामध्ये ब्राऊनीज, ब्रेड, कुकीजचा समावेश करू शकता. तुम्ही बनवलेला पदार्थ मित्रांसोबत देखील शेअर करू शकता.

स्प्रिंकलडे निमित्त सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यात रंगीबेरंगी दिसणाऱ्या स्प्रिंकलचा वापर करू शकता. नाश्त्यात पॅनकेक बनवत असाल तर सजावटीसाठी स्प्रिंकलचा वापर करू शकता.

स्प्रिंकलडे निमित्त डोनट बनवण्याचा विचार करत असाल तर त्यावर स्प्रिंकल टाकून आस्वाद घेऊ शकता. तसेच हा पदार्थ लहान मुलांच्या आवडीचा असल्याने त्याचा दिवस खास बनेल. कोणत्याही पदार्थावर रंगीत स्प्रिंकल टाकल्यास त्याची चव आणि रंग वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT