Ghee sakal
लाइफस्टाइल

Ghee: तूप विकत घेताय? शुद्ध-अशुद्ध कसं ओळखाल?

आज आम्ही तुम्हाला शुद्ध तूप आणि अशुद्ध तूप यातील फरक सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जेवणात तूपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग अगदी जेवणापासून ते कोणत्याही शुभकार्यात तूप हे वापरले जाते. सहसा ग्रामीण भागात तूप हे घरीच दुधापासून बनविले जाते. पण अनेकदा आपण तूप विकत सुद्धा घेतो. हे विकत घेतलेले तूप शुद्ध आहे की अशुद्ध हे कसं ओळखावं, हा प्रश्न वारंवार पडतो. आज आम्ही तुम्हाला शुद्ध तूप आणि अशुद्ध तूप यातील फरक सांगणार आहोत. (how to check the purity of ghee check Easy ways)

  • एक चमचा तूप तुम्ही गरम करू शकता. जर तूप गरम होऊन लगेच वितळले आणि गडद तपकिरी रंग आला तर तुमचे तूप शुद्ध आहे असे समजावे. पण तूप वितळण्यास वेळ लागत असेल आणि वितळल्यानंतर पिवळा रंग येत असेल तर ते तूप भेसळयुक्त आहे असे समजावे.

  • तूपाला तुम्ही हाताने स्पर्श केला आणि तूप विघळले तर तूप शुद्ध आहे पण थराप्रमाणे राहले की समजायचं तूप भेसळयूक्त आहे.

  • भेसळयुक्त तुपात आयोडीनचे दोन थेंब टाकले तरी रंग जांभळा येतो. कारण त्या तूपात स्टार्च मिसळलेला असतो.

  • वितळलेल्या तूपात साखर घालावी आणि हे मिश्रण हलवावे. त्यानंतर जर तुम्हाला तळाशी लाल रंग दिसून आला तर समजून जावे यात वनस्पती तेल आहे.

  • शुद्ध तूपाचा सुगंध येतो तर भेसळयुक्त तूपाचा कोणताही सुगंध येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT