Copper Vessel Cleaning Tips Sakal
लाइफस्टाइल

Copper Vessel Cleaning Tips सोन्यासारखी चमकतील देवाची भांडी, पितळ्या-तांब्याची भांडी या नॅचरल पेस्टने करा स्वच्छ

Copper Vessel Cleaning Tips : पितळ्याची व तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध नैसर्गिक सामग्रींचाही वापर करू शकता.

Harshada Shirsekar

देवघरातील देवाची भांडी स्वच्छ करण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश जण बाजारात मिळणाऱ्या पावडरचा वापर करतात. पण या पावडरच्या वापरामुळे हाताच्या त्वचेचे नुकसान होते, जसे की हाताची त्वचा-नखे काळी पडणे, त्वचा कोरडी होणे इत्यादी. इतके करुनही देवाच्या भांड्यांवर म्हणावी तशी चमक टिकून राहत नाही. 

या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आपण घरच्या घरी साधा-सोपा व नैसर्गिक उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला अधिकच खर्च करावा लागणार नाही. कारण देवाची भांडी स्वच्छ करण्यासाठी तयार करावी लागणाऱ्या नॅचरल पेस्टसाठीची सामग्री तुमच्या किचनमध्ये सहजासहजी उपलब्ध असेलच. शिवाय यामुळे हाताच्या त्वचेचंही नुकसान होणार नाही. असा दुहेरी फायदा तुम्हाला या घरगुती उपायामुळे मिळेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

नॅचरल पेस्ट तयार करण्यासाठी लागणारी सामग्री  

  • बेसन पीठ - तीन चमचे

  • मीठ - एक चमचा

  • दही - तीन चमचे

  • लिंबाचा रस - दोन चमचे

  • हळद - एक चमचा

तांब्या-पितळेची भांडी कशी करावी स्वच्छ ?

  • सर्वप्रथम एक बाऊल घ्या. त्यामध्ये तीन चमचे दही मिक्स करा.

  • आता यामध्ये एक चमचा मीठ देखील मिक्स करावे.

  • नंतर मिश्रणामध्ये तीन चमचे दही, हळद आणि लिंबाचा रस मिक्स करा.

  • वरील सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे आणि पेस्ट तयार करावी.

  • यानंतर हातावर थोडीशी पेस्ट घ्या आणि तांबे-पितळेची भांडी हलक्या हाताने घासून घ्या. 

  • स्क्रब केल्यानं भांड्यावर जमा झालेली घाण, काळे डाग स्वच्छ होतील. 

  • नॅचरल पेस्टने घासलेली देवाची भांडी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. 

  • धुतलेली भांडी एका कापडावर नितळण्यास ठेवून द्या. 

NOTE : कॉपरच्या भांड्यावर कोणतेही क्लिंझिंग एजंट वापरण्यापूर्वी भांड्याच्या काही भागावर पॅच टेस्ट नक्की करून पाहावी.

Content Credit Instagram @hindi.beauty.tipsandbeauty.blog.hindi/@ashwilifestyle

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT