how to deal with time pressure by hansa yogendra Sakal
लाइफस्टाइल

वेळेचा दबाव कसा हाताळायचा?

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. हंसा योगेंद्र

काही लोक नेहमी कुरकुर करतात, माझ्याकडे वेळ नाही, खूप काम आहे. तर, काहींना कामाचे ओझे वाटते. अर्थात ही समस्या वेळेच्या कमतरतेची नसून समजूतदारपणाची, वृत्तीविषयक आहे. तुम्हीच वेळेच्या दबावाला मानसिक दबावात प्रकट करता. मुळात वेळेचा दबाव चांगला आहे. तो तुम्हाला सक्रिय बनवतो, एकाग्रता वाढवतो, तुमचे व्यवस्थापन कौशल्य वाढवते, तुमचे मन जागरूकतेच्या उच्च स्थितीत ठेवतो.

प्रत्येक वेळी धावपटू काही अंतर गाठण्यासाठी वेळ ठरवतो, त्याची कार्यक्षमता वाढते. तो त्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित केल्याने त्याचा वेग वाढतो. तुम्ही करत असलेल्या सर्व कामांसाठी तुम्ही नेहमीच विशिष्ट मुदत ठेवली पाहिजे.

यामुळे तुमच्या जीवनात शिस्त येईल. महाभारतात भीष्म पितामहांची एक प्रसिद्ध कथा आहे. पितामह कौरवांच्या बाजूने होते आणि पांडवांशी लढत होते. पितामह विचार करू लागले की आता अर्जुन आणि कृष्ण एका बाजूला आहेत, म्हणजे धर्म स्थापन झाला आहे आणि अधर्म नष्ट होईल.

आता माझे काम इथे झाले असून मला माझे शरीर सोडायचे आहे. त्यांनी जाहीर केले की सात दिवसांनी शरीर सोडणार आहे. पांडवांनी हे ऐकले तेव्हा ते पितामहांना भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रश्न विचारला.

‘‘पितामह आपण एवढे उदंड आयुष्य जगलात, तुम्हाला खूप अनुभव आहे, आयुष्य कसे जगावे हे तुम्ही सांगा. त्यावर पितामहांनी उत्तर दिले, ‘‘आयुष्यात दोन गोष्टींची काळजी घ्या. प्रथम, तुमचे शरीर. तुम्ही तुमचे सर्व धर्म शरीराद्वारे पार पाडत असता, म्हणून त्याची काळजी घ्या.

शरीराला इजा होईल असे काहीही करू नका. शरीर आणि मन दोन्ही एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे त्यांची काळजी घ्या. आणि दुसरी म्हणजे नेहमी वेळेच्या दबावाखाली जगणे. स्वत:ला सांगा की तुम्ही तुमचे संपूर्ण कार्य वेळेच्या दबावाखाली पूर्ण कराल. क्रमबद्ध जीवनासाठी प्रत्येकाने वेळेच्या दबावाखाली जगण्याची ही कला शिकली पाहिजे. हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य होतं.

आम्ही वेळेच्या दबावात विकसित होतो. तुमच्या मनाला तामसांवर मात करण्याची क्षमता मिळते. बहुतेक वेळा अयोग्य व्यवस्थापनामुळे आपण तणावात जातो. योग्य व्यवस्थापन तुम्हाला तुमची अंतिम मुदत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात मदत करू शकते. आपल्या दिवसाची सुरुवात रोजच्या वेळापत्रकाने करा. ही तुमची अल्पकालीन योजना असेल. तुमच्या कामाच्या गरजेनुसार दीर्घकालीन योजना म्हणून साप्ताहिक वेळापत्रक देखील ठेवा.

वेळेचा दबाव हा स्व-प्रेरित ताण असल्यामुळे, तुम्ही दररोज योगाभ्यास केला पाहिजे. योगासने, प्राणायाम, क्रिया आणि ध्यान तुम्हाला कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी दिवसभर उत्साही ठेवतील. कोणतेही जेवण वगळू नका आणि ताजे शिजवलेले जेवण खा. हे लहान क्रियाकलाप असू शकतात, परंतु ते आपल्या कामाच्या दरम्यान आपल्या मनाची स्थिती ठरवतात. प्रत्येक अंतिम मुदत आव्हान म्हणून घ्या. स्वतःला अपग्रेड करा आणि काम करत रहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT