Office Table Sakal
लाइफस्टाइल

Office Table: ऑफिस टेबल सजवण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, कायम राहाल उत्साही

पुजा बोनकिले

Office Table: अनेक लोकांना घराप्रमाणेच ऑफिस टेबल सजवण्याची आवड असते. असे म्हणतात की ऑफिस टेबल स्वच्छ आणि प्रसन्न असेल तर काम करण्याचा उत्साह वाढतो. तसेच जर ऑफिस टेबलवर गोंधल असेल तर काम नीट होत नाही. तुम्हीही ऑफिस टेबल सजवण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला काम करताना उत्साही वाटेल.

इनडोअर रोप

कोणतेही जागा सजवण्यासाठी इनडोअर रोप लावणे हा एक उत्तम पर्याय आहे. ऑफिस टेबलवर रोप ठेवल्याने मन शांत राहते आणि मुड फ्रेश होतो. तुम्ही ऑफिस टेबलवर एक किंवा दोन इनडोअर रोप लावू शकता. तसेच डोळ्यांसाठी देखील आरोग्यदायी असते. यासाठी तुम्ही टेराकोटा पॉटचा वापर करू शकता.

ब्राइट किंवा कलरफुल

रंग केवळ आयुष्य रंगीत करत नाहीत तर आपला मुड देखील फ्रेश करतात. त्यामुले तमचा डेस्क रिकामा न टेवता त्यावर रंगीत पेन स्टॅड ठेवावा, रंगीत किंवा चमकीचा पेन , पेन्सिल, स्टॅपलर ठेऊ शकता.

Office Table

प्रेरणादायी कोट्स वापरा

ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळी आपण तणावात जातो किंवा निराश होतो. अशावेळी स्वत:ला प्रोत्साहन मिळण्यासाठी कोट्स लिहावे. यासाठी तुम्ही कलरफुल पेपरचा वापर करू शकता. तुम्ही ऑफिस टेबलवर किंवा टेबलसमोर असलेल्या भिंतीवर लावू शकता.

फोटो फ्रेम

तुम्ही घरापासून दूर राहत असाल तर आवडत्या आणि प्रिय लोकांचे फोटो फ्रेम लावू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कुटूंब , मित्र परिवार, आई-वडील यांचा फोटो ठेऊ शकता. तुम्ही एखाद्या ट्रिपचा देखील फोटो ठेऊ शकता.

पुढील वस्तू देखील ठेऊ शकता

तुम्हाला जर खेळणी आवडत असेल तर तुम्ही आवडते खेळ ऑफिस टेबलवर ठेऊ शकता. तसेच क्रिस्टलचे झाड देखील ठेऊ शकता. ऑफिस टेबल सजवण्याचा हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

SCROLL FOR NEXT