Monsoon  sakal
लाइफस्टाइल

Monsoon Tips: पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत? मग हे उपाय नक्की ट्राय करून पाहा

पावसाळ्यात ओले कपडे वाळवणे म्हणजे खूप अवघड काम असते.

Aishwarya Musale

पावसाळ्याचे आगमन झाले असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. लोक या ऋतूचा खूप आनंद घेतात. पावसाळ्यात हवेत ओलावा असतो आणि माणसांच्या अंगावर लवकर घाम येतो. ढगाळ वातावरण असते आणि जास्त ऊन नसते. त्यामुळे धुतल्यानंतर कपडे व्यवस्थित सुकत नाहीत.

यासोबतच कपड्यांमधून दुर्गंधीही येऊ लागते. अशा स्थितीत लोक खूप अस्वस्थ होतात. आज आम्‍ही तुम्‍हाला कपडे सुकवण्‍याच्‍या सोप्या ट्रिक्स सांगत आहोत, ज्यामुळे ओले कपडे काही मिनिटांत सुकवता येतात. तुमचे ओले कपडे घालण्यायोग्य होतील आणि त्यांचा वास येणार नाही.

वॉशिंग मशिन वापरा – वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर ते ड्रायरमध्ये ठेवून वाळवण्याचा प्रयत्न करा. यामुळे कपड्यांमधील अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि ते कोरडे होतील. यानंतर, तुम्ही कपडे उन्हात किंवा हवेत ठेवा. यामुळे काही मिनिटांतच कपडे कोरडे होतील. आजकाल मशीनमध्ये ऑटोमॅटिक ड्रायर्स येतात, ज्यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते.

हेअर ड्रायर वापरा - जर तुमचे कपडे थोडेसे ओले असतील तर ते शक्य तितक्या लवकर सुकविण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी हवा तुमचे कपडे सुकवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल आणि कपडे ओले असतील तर हेअर ड्रायर वापरणे चांगले. यामुळे कपड्यांचा वास निघून जाईल.

ओव्हनमध्ये छोटे कपडे सुकवा - तुम्ही तुमच्या मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर सॉक्स आणि अंडरगारमेंट्ससारखे छोटे कपडे सुकवण्यासाठी देखील करू शकता. ओव्हनमध्ये कपडे ठेवण्यापूर्वी ते चांगले पिळून घ्या आणि पाणी काढून टाका. जर तुम्हाला ही पद्धत वापरायची असेल तर तुम्ही कपडे एका बेकिंग शीटवर ठेवू शकता आणि ओव्हनमध्ये ठेवू शकता. या दरम्यान काळजी घ्या.

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा कपडे - तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ओले कपडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने देखील लवकर सुकवले जाऊ शकते. तुमचे ओले कपडे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे तुमचे कपडे फास्ट कोरडे होतील आणि घालता येतील. कपड्यांचा ओलावा फ्रीजमध्ये निघून जाईल आणि वास येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT