पावसाळ्यात कपडे वाळवणं Esakal
लाइफस्टाइल

पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत? मग Washing Machine मध्ये कपडे धुताना वापरा ही ट्रीक

पावसाळ्यात Monsoon सगळ्यात मोठी ठरणारी आणखी एक अडचण म्हणजे धुतलेले कपडे वाळवणं. अगदी तुम्ही वॉशिंग मशिनचा वापर करत असलात तरी अर्धे पिळले गेलेले कपडे वाळण्यासाठी देखील २-३ दिवस वाट पाहवी लागते. त्यासाठीच्या या टिप्स

Kirti Wadkar

पावसाळा हा गार वातावरण, सुंदर निसर्ग, रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे हवा हवासा वाटत असला तरी तो काही वेळाला मात्र नकोसाही वाटतो. कारण बऱ्याचदा सलग अनेक दिवस पाऊस सुरु राहिल्याने घराबाहेर पडणं मुश्किल होतं. रस्त्यांवर पाणी साचतं, घरात सतत ओलावा राहतो अशा वेळी पावसाळा नकोसा वाटू लागतो. How to dry your clothes early during monsoon season

पावसाळ्यात Monsoon सगळ्यात मोठी ठरणारी आणखी एक अडचण म्हणजे धुतलेले कपडे वाळवणं. खासकरून पावसात जर तुम्ही घराबाहेर पडलात तर तुमचे कपडे खराब आणि ओले झालेच म्हणून समजा. अशा वेळी पावसाळ्यात वारंवारं कपडे धुवावे Washing Clothes लागतात.

त्यात अनेक दिवस ऊन तर सोडाच साधा सुर्यप्रकाशही येत नसल्याने कपडे वाळवण्याची मोठी अडचण निर्माण होते.

अगदी तुम्ही वॉशिंग मशिनचा वापर करत असलात तरी अर्धे पिळले गेलेले कपडे वाळण्यासाठी देखील २-३ दिवस वाट पाहवी लागते. अशा वेळी काही ट्रिक वापरून तुम्ही वॉशिंग मशिनमध्ये धुतलेले कपडे लवकर वाळवू शकता.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ही घ्या काळजी

- वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना सर्वप्रथम ते वेगळे करणं गरजेचं आहे. म्हणजेच अधिक मळलेले आणि कमी मळलेले कपडे. किंवा जाड आणि पातळ कपडे वेगवेगळे करा.

- तसंच गरजेनुसार कपडे धुण्याला प्राधान्य द्या. म्हणजेच तुम्हाला लगेच पुन्हा लागणारे कपडे यात शाळेचे गणवेश किंवा ऑफिसचे युनिफॉर्म आधी धुणं नंतर इतर कपडे धुणं याची वर्गवारी करा.

- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही जीन्स किंवा इतर जाड कपडे मशिनमध्ये धूत असताना ते एक्स्ट्रा स्पिन करू शकता. यामुळे कपड्यांमधील अतिरिक्त पाणी निघून जाण्यास मदत होईल आणि ते लवकर वाळतील.

हे देखिल वाचा-

- तसंच मशिनमध्ये देण्यात आलेला ड्राय पर्याय तुम्ही पुन्हा मॅन्युअली निवडून काही जास्त मिनिटांसाठी कपडे ड्राय करता येतील.

- अनेकदा मशीनमध्ये कपड्यांचा गुंता होतो. यामुळे मशीन पॉझ करून हा गुंता सोडवणं गरजेचं आहे.

- अनेकांना कपडे दोनदा स्पीन करण्याने किंवा ड्राय करण्याने फाटू शकतात अशी भिती असते. यासाठी तुम्ही बाजारात किंवा ऑनलाईन मिळणाऱ्या नेट बॅगचा वापरू शरू शकता. यामध्ये कपडे फाटण्याचा धोका नसतो.

- तसंच कपडे पुन्हा स्पीन किंवा ड्राय करताना ते मोकळे करून चहू बाजूला पसरून ठेवल्यासही ते फाटणार नाहीत शिवाय लवकर वाळण्यास मदत होईल.

- कपडे वाळत घालताना जर तुम्ही दोरीवर ते वाळवणार असाल तर दोन दोऱ्यांमध्ये पुरेस अंतर हवं त्यात फार कमी अंतर नसावं.

- तसचं दोरीवर कपडे वाळत घालताना ते मोकळे पसरवून टाका. शक्य झाल्यास स्डॅण्डचा वापर करा.

घाईच्या वेळी या ट्रिक येतील कामी

अनेकदा पावसाळ्यामध्ये एखादे कपडे लगेचच दुसऱ्या दिवशी घालायचे असतात. अशावेळी ते कपडे वाळण्याची मोठी चिंता असते. पंख्या खाली कपडे वाळले नाहित तर पंचाईत होईल अशी चिंता असते. अशावेळी तुम्ही काही ट्रिक वापरून अगदी काही तासांमध्ये कपडे वाळवू शकता.

- पातळ कपडे असल्यास ते पंख्याखाली वाळत टाका.

- कपडे धुतल्यानंतर एखाद्या जाड टॉवेलमध्ये गुंडाळून एकत्र चांगलं पिळा. यामुळे कपड्यातील पाणी टॉवेल शोषून घेईल. त्यानंतर ते कापड चांगलं झटकून वाळत घाला.

- एखादा कपडा पूर्णपणे वाळलेला नाही किंवा दमट वाटत असल्यास तुम्ही त्याला काहीसं ओलं असतानाच इस्त्री करा. त्यानंतर ते हँगरला लावून तासाभरासाठी पंख्याजवळ ठेवा.

- तुम्ही घाईच्या वेळी एखादं ओलं कापड वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू शकता.

अशा प्रकारे काही ट्रीक वापरून तुम्ही पावसाळ्यात कमी वेळेत कपडे वाळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT