Hangover esakal
लाइफस्टाइल

New Year Celebration : हँगओव्हर उतरवायचाय? उपाय आहे तुमच्या किचनमध्येच

आता न्यू इयर पार्टीचा माहोल सुरू झाला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला पार्टी केल्यावर १ तारखेला हँगओव्हर कसा उतरवायचा हा मोठा प्रश्न असतो.

सकाळ डिजिटल टीम

How to Get Rid of Hangovers : सरत्या वर्षाला आता लवकरच निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झाले आहे. महिनाभर आधीच अनेकांची पार्टीसाठीचे बुकींग झालेले आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरला मनसोक्त पार्टी केली जाणार. तो दिवस तर साजरा होतो, पण दुसऱ्या दिवशी डोके धरून बसण्याची वेळ येते. कारण आदल्या दिवशीचा हँगओव्हर उतरलेला नसतो.

Hangover

हँगओव्हर म्हणजे काय?

आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान केल्यामुळे हँगओव्हर होण्याची शक्यता असते. अल्कोहोल शरीरामध्ये गेल्यानंतर काही तास आपण नशेमध्ये असतो. रात्री घेतलेल्या ड्रिंक्सची नशा उतरल्यानंतर सकाळी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. यालाच `हँगओव्हर' असे म्हटले जाते. मद्यपान केल्यावर काही कालावधीनंतर डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ किंवा उलट्या होणे यालाच हँगओव्हर समजले जाते.

Hangover

काय असतात लक्षण?

रात्री अल्कोहोलयुक्त पेय प्यायल्यानंतर सकाळी डोक आणि पोट दुखायला लागते. सकाळी शरीरामध्ये त्राण राहत नाही. ड्रिंक्स घेतल्यामुळे शरीरावर निगेटिव्ह इफेक्ट होतो. हँगओव्हरमुळे संपूर्ण दिवसही खराब होऊ शकतो.

हँगओव्हर दरम्यान होणार्‍या डोकेदुखीचे खरे कारण डिहायड्रेशन आहे. अल्कोहोल सेवन केल्यानंतर सतत बाथरूमला जाण्याची इच्छा होते.

सतत बाथरूमला गेल्यामुळे मूत्राद्वारे अधिक प्रमाणामध्ये शरीरातील पाणी बाहेर पडते. परिणामी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते. पुढे रक्तातील शुगर लेवल खालावते. मद्यपान करणे थांबवल्यामुळे आपले शरीर सद्यस्थितीवर कंट्रोल करायचा प्रयत्न करते.

Hangover

घरगुती उपाय

1. भरपूर पाणी प्यावे.

मद्यपान करुन झाल्यावर खूप पाणी पिणे आवश्यक आहे. अल्कोहोल सेवनानंतर पाण्याचे सेवन केल्यामुळे हँगओव्हरचा प्रभाव कमी होतो.

ड्रिंक्स घेतल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या नाहीशी होते. त्याचसोबत मूत्रामधून शरीरातील अनावश्यक टॉक्सिक द्रव्य देखील बाहेत पडतात.

2. नारळ पाणी प्यावे.

मद्यपानाचा कार्यक्रम संपला की, खूप पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. नॉर्मल पाण्याच्या जागी इलेक्ट्रोलाइट्सनी परिपूर्ण असलेल्या पेयाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरु शकते. कोणत्याही प्रकारचे स्पोर्ट्स ड्रिंक्स किंवा नारळ पाणी अशा पेयांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स मुबलक प्रमाणामध्ये आढळले जातात.

3. भरपूर प्रमाणामध्ये ऑईली फूड खावे.

ड्रिंक्स घेण्यापूर्वी सुरुवातीलाच तेलकट खाद्यपदार्थ खावेत. ऑईली फूड खाल्यामुळे हँगओव्हरवर परिणाम होतो असे म्हटले जाते. मद्यपानापूर्वी लोणचे खाण्याची पद्धत आपल्याकडे अस्तित्वामध्ये होती.

पिझ्झा, फ्राइज यासारख्या फास्ट फूटमध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. लोणच्याप्रमाणे या पदार्थांचे सेवन देखील समान रिझल्ट मिळतात. हे पदार्थ पोटामध्ये गेल्यानंतर आतड्यांमध्ये चिकटले जातात किंवा त्याच्या तेलकटपणामुळे मद्य आतड्यांपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

4. ड्रिंक्स घेताना स्विट्स खाणे फायदेशीर ठरते

मद्यपान करताना स्विट्स खाल्यामुळे हँगओव्हर कमी होऊ शकतो. परंतु दारु पिताना गोड खाणे काही अंशी विचित्र वाटू शकते.

गोड पदार्थ ड्रिंक्स घेताना खाणे आवश्यक आहे. ड्रिंक्स घेण्यापूर्वी स्विट्स खाल्यामुळे फ्रॅक्टोज वेगाने डायजेस्ट होऊ शकतात. त्यामुळे अल्कोहोलच्या पचनक्रियेचा वेग कमी होऊ शकतो. तुम्ही याऐवजी गोड पेयदेखील पिऊ शकता.

रिणामी नेहमी मद्यपान करत असतानाच गोड खावे किंवा पेय प्यावे. कॉकटेल सोबत संत्र्यापासून तयार केलेला ज्यूस पिणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

5. रात्रीच्या मद्यपानानंतर सकाळी ब्रेकफास्ट करावा

सकाळी उठल्या-उठल्या लगेच तगडा ब्रेकफास्ट करावा. मद्यपानामुळे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भासते. ब्रेकफास्ट केल्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स लेवल नॉर्मल होते. त्यासह बॉडीमध्ये कॅलरीज देखील जातात. टोस्ट, ओट्स यासारखे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाल्यामुळे हँगओव्हर कमी होतो. काहीजण जळालेले टोस्ट खाण्याचा सल्ला देतात.

6. आल्याचे सेवन करावे

फार पूर्वीपासून आल्याचा वापर उलट्या आणि मळमळ थांबवण्यासाठी केला जातो. प्रत्यक्ष आल्याच्या जागी आल्याचा चहा किंवा आलेपाक अशा पर्यायाचा वापर आपल्याकडे केला जातो. ड्रिंक्स घेण्यापूर्वी आलेपाक तोंडामध्ये टाकून चघळल्यामुळे हँगओव्हरचा इफेक्ट कमी होऊ शकतो.

7. भरपूर झोप काढावी

हँगओव्हरपासून वाचण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. रात्री ड्रिंक्स घेतल्यानंतर सकाळी झोपेतून उठल्यावर स्वतःवर कंट्रोल करता येत नसल्याचा अनुभव आल्यास पुन्हा झोपणे हा परफेक्ट ऑप्शन मानला जातो. हँगओव्हर होण्यामागे झोप पूर्ण न होणे हे कारण नसले, तरीही झोप पूर्ण न झाल्यामुळे हँगओव्हरचे प्रमाण वाढून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT