Cooler Care: गेल्या काही दिवसांपासून काही भागांमध्ये पाऊस आणि कडक उन्ह पडत आहे. कुलरमुळे कडक उन्हामुळे थंडावा मिळतो. पण थोड्यावेळाने कुलर पाहिजे तसा थंडावा देत नाही. मे महिन्यातील उष्णता लोकांसाठी अत्यंत वेदनादायी असते. लोकांना घराबाहेर पडावेसे वाटत नाही.
पण कूलरसमोरच्या खोलीत दिवसभर घालवणं खूप अवघड आहे, कारण कूलरच्या हवेमुळे खोली खूप दमट होते. जास्त दमट वातावरणामुळे शरीर चिकट होऊ लागते आणि खोलीत राहावेसे वाटत नाही. जर तुम्हालाही थंड हवेमुळे खोलीतील दमटपणाचा त्रास होत असेल तर पुढील काही टिप्स फोलो करून खोलीतील दमटपणा कमी करू शकता.
कूलरमुळे होणाऱ्या दमटपणामुळे रात्री शांत झोप लागत नाही. खोलीतील दमटपणा दूर करण्यासाठी कूलर खोलीबाहेर किंवा खिडकीत ठेवावे.
खोलीत आल्यावर सर्वात आधी फॅन सुरू करावा. यामुळे खोलीतील गरम हाव बाहेर निघून जाईल. नंतर कुलर लावावा. यामुळे खोलीत थंडावा कायम राहील.
खोलीतील दमटरणा कमी करण्यासाठी तुम्ही कूलरसोबत पंखाही चालू ठेवावा आणि खिडकी उघडी ठेवावी. यामुळे खोलीतील दमटपणा कमी होईल. तसेच तुम्हाला चिकटपणा जाणवणार नाही. कारण पंख्यामुळे कूलरची थंड हवा खोलीत पसरते.
जर कूलर खोलीच्या बाहेर ठेवता येत नसेल. कुलरमधील पाण्याचा पंप बंद करा. फक्त कूलरचा फॅन चालु ठेवा. कारण कूलरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे खोलीत दमटपणा निर्माण होतो. जर तुमच्या खोलीत खिडकी नसेल आणि खोली पूर्णपणे बंद असेल, तर तुम्ही पाण्याशिवाय कुलर चालवा. यामुळे खोलीत दमटपणा निर्माण होणार नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.