माणसाच्या रोजच्या पेहरावात बुट हा महत्त्वाचा भाग आहे. बुट घातलेल्या व्यक्तीचा लूक उठून दिसतो पण अनेकदा हेच बुट तुमच्यासाठी किंवा इतरांसाठी त्रासदायक ठरतात. अनेकदा दिवसभर बूट घालत असल्याने पायांना घाम घेतो आणि बुटांपासून स्मेल येतो.
अनेकजण या बूटांच्या दूर्गंधीपासून त्रासून जातात. पण आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे आपल्याला सहज दुर्गंधीपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया. (how to get rid of smelly shoes try these tips)
बूटांपासून दुर्गंधी येत असेल तर बूट किंवा इनसोल नियमित थंड पाण्याने धुवा.
अनेकदा बुटांना दुर्गंधी ही पायाला आलेल्या घामामुळे येते. जर तुमचे पाय कोरडे असेल तर तिथे कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया निर्माण होत नाही. अशात आपल्या पायला डियोड्रेंट लावा.
असे मोजे वापरा जे घाम शोषून घेतात. त्यामुळे बुटांमध्ये दुर्गंधी पसरणार नाही.
वॉशेबल इनसोल ट्राय करा. जे कॉटन टेरी कपड्यापासून बनतात. याचा सोल रबर लेटेक्सचा असतो. याला तीन ते सहा वेळा घालायच्या आधी धूवा.
बुटांना येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी लॅव्हेंडर तेल उत्तम पर्याय आहे. या तेलाचे काही थेंब बुटामध्ये शिंपडल्याने दूर्गंधी नाहीशी होते.
ज्या लोकांच्या बुटांमधून खूप जास्त दुर्गंध येते, त्यांनी बुटामध्ये कोरड्या चहाच्या पिशव्या ठेवणे कधीही उत्तम असतं.
याशिवाय बेकिंग सोडा जर दररोज रात्री बुटांमध्ये शिंपडला तर बुटामधील दूर्गंधी दूर होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.