Mango Season : उन्हाळा सुरू होताच सर्व बाजारपेठा आंब्यांनी बहरल्या आहेत. खेडेगावापासून शहरांच्या बाजारपेठांमध्ये आंबे विकण्यासाठी आले आहेत. आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे संपूर्ण वर्षभर वाट पाहिल्यानंतर तुम्हाला रसाळ आणि गोड आंब्याची चव चाखता येते.
हापूस आंब्याची चव महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील नागरिकांनादेखील प्रचंड आवडते. काही ठिकाणी परदेशात देखील हापूस आंबे आवडीने खाल्ले जातात. पण, तुम्हाला माहितीये का? सध्या बाजारात देवगडचा आणि दक्षिण भारतातला हापूस विक्रीस आला आहे. यातला देवगडचा कोणता आणि आपल्या दक्षिण भारतातला कोणता, हे कसे ओळखायचे?
आकार : देवगडचा हापूस आकाराने देठाकडे फुगीर असतो. दक्षिण भारतातला हापूस देठाकडे चपट्या आकाराचा असतो.
पेटी : देवगडच्या हापूस आंब्याची पेटी कायम लाकडी असते; तसेच दक्षिण भारतातील हापूस आंब्याची पेटी साध्या पुठ्ठ्याची असते.
वजन : देवगडच्या हापूस आंब्याचे वजन साधारण २५० ते ४०० ग्रॅम इतके असते. याची लाकडी पेटी ३, ५ आणि १० डझनाची असते. दक्षिण भारतातील हापूस आंब्याचे वजन ३०० ते ५०० ग्रॅम इतके असते. ही कागदी पेटी केवळ १ ते २ डझनाची असते.
रंग : देवगडचा हापूस कापल्यावर केशरी रंगाचा दिसतो, तर दक्षिण भारतातील हापूस कापल्यावर पिवळ्या रंगाचा दिसतो.
चव : या दोन्ही आंब्यांच्या चवीतही बराच फरक आहे. देवगडचा हापूस आंबा मधासारखा मधाळ लागतो, तर दक्षिण भारतातील आंब्याची चव थोडी आंबट असते.
साल : देवगड हापूस आंब्याची साल अगदी पातळ असते, तर दक्षिण भारतातील हापूस आंब्याची साल थोडी जाडसर असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.