Tips For Mosquitoes esakal
लाइफस्टाइल

Tips For Mosquitoes : डासाने वैतागला आहात? गुड नाइट नाही तर किचनमधले हे पदार्थ आहेत जास्त विषारी...

डासांपासून वाचणे फार कठीण होऊन बसते. गेले काही दिवसांपासून तुम्हीही या समस्येने हैराण असाल ना?

Lina Joshi

Tips To Keep Mosquitoes Out : उन्हाळ्यात डासांचे प्रमाण खूप वाढते. अशा परिस्थितीत पाऊस पडला तर डासांपासून वाचणे फार कठीण होऊन बसते. गेले काही दिवसांपासून तुम्हीही या समस्येने हैराण असाल ना? त्यात इतकी गरमी वाढली आहे की दार खिडक्या उघडे ठेवणं कठीण आहे, अशात हे टाळण्यासाठी, बहुतेक लोक रासायनिक अगरबत्ती किंवा कॉइल वापरतात.

हे डासांचे औषध बाजारात सहज उपलब्ध असल्यामुळे प्रत्येकजण काहीही विचार न करता खरेदी करतो. पण हे मस्‍क्‍यटो रिपेल्‍ंट प्रोडक्‍ट अतिशय खराब रसायनांनी बनलेले असतात आणि त्यामुळे अनेक वेळा लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. शिवाय हे मुलांसाठीही धोकादायक ठरु शकते. अशा परिस्थितीत डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते.

इथे आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला इजा न करता घरातील डासांना पळवून लावू शकता.

१. कॉफी पावडर

कॉफी केवळ झोपच आणत नाही तर डासांना दूर ठेवण्याचे काम करते. साचलेल्या पाण्यात कॉफी पावडर शिंपडल्यास त्यात डासांच्या अळ्या वाढत नाहीत, असे म्हणतात. याशिवाय घरात डास वाढले असतील तर अंड्याच्या कॅरेटमध्ये १-२ चमचे कॉफी टाकून जाळून टाका. यामुळे एका मिनिटात डासांचा नाश होतो.

२. लसूण पाणी फवारणी

तुम्ही आत्तापर्यंत लसणाचा वापर फक्त जेवणातील चव वाढवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल, सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी केला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, लसूण देखील डासांना दूर करू शकतो? होय, यासाठी तुम्हाला लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळाव्या लागतील. नंतर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि ते घरामध्ये शिंपडा.

३. लवंग आणि लिंबू वापरा

लिंबू आणि लवंग हे डास दूर करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. खरं तर, डास त्याचा वास सहन करू शकत नाहीत आणि मरतात. अशावेळी डासांना घालवण्यासाठी लिंबूचे तुकडे करुन त्यात ४-५ लवंगा टाकून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. डासांपासून मुक्त होण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे.

४. सफरचंद व्हिनेगरपासून सर्व डास पळून जातील

सफरचंद व्हिनेगर हा डासांना दूर ठेवण्याचा अतिशय प्रभावी उपाय आहे. फवारणीच्या बाटलीत समान प्रमाणात पाण्यात मिसळून घरामध्ये फवारणी करा. आपण ते आपल्या शरीरावर देखील शिंपडू शकता. याच्या तीव्र वासामुळे डास इकडे तिकडे फिरकत नाहीत, असा समज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT