Besan Pohe Cutlet esakal
लाइफस्टाइल

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Besan Pohe Cutlets : सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज पोहे, उपमा, शिरा, इडली खाऊन बोअर व्हायला होते.

Monika Lonkar –Kumbhar

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज पोहे, उपमा, शिरा, इडली खाऊन बोअर व्हायला होते. त्यामुळे, नाश्त्याला काहीतरी वेगळे करून खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. जर तुम्हाला असा वेगळा आणि चवदार नाश्ता हवा असेल तर तुम्ही नाश्त्याला बेसन पोहे कटलेट बनवू शकता.

बेसन पोहे कटलेट बनवायला अतिशय सोपे आहेत. खायला चवदार आणि खुसखुशीत लागणारे हे कटलेट सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे कटलेट्स बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात बेसन पोहे कटलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • पोहे ३ वाटी

  • बेसन १ वाटी

  • रवा १ कप

  • बारीक चिरलेला कांदा १

  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • लाल तिखट १ चमचा

  • अर्धा चमचा हळद

  • जिरे पावडर १ चमचा

  • चाट मसाला १ चमचा

  • तेल आवश्यकतेनुसार

  • चवीनुसार मीठ

बेसन पोहे कटलेट्स बनवण्याची सोपी पद्धत :

  • बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे ५ ते ७ मिनिटे पाण्यात भिजवा.

  • तोपर्यत बेसन कोरडे भाजून घ्या. या बेसनामध्ये रवा, हिरवी मिरची, जिरेपूड, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ घाला.

  • आता भाजलेले बेसन थंड झाल्यावर पोह्यात घालून चांगले मळून घ्या.

  • त्यानंतर, तळहाताला थोडे तेल लावून पोह्यांच्या मिश्रणापासून कटलेट तयार करा. तुम्हाला हवा तसा आकार द्या.

  • आता कढईत तेल गरम करून पोहे कटलेट मंद आचेवर तळून घ्या.

  • सोनेरी रंग येईपर्यंत कटलेट दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या.

  • आता तुमचे बेसन पोहे कटलेट तयार आहेत. हिरवी पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT