Sakal
लाइफस्टाइल

Mushroom Pasta Recipe: लहान मुलंही खातील आवडीने 'मशरूम पास्ता', फक्त नोट करा रेसिपी

पुजा बोनकिले

सकाळ साप्ताहिक- स्नेहा जोगळेकर

Mushroom Pasta Recipe: लहान मुले मशरूम खात नसतील तर तुम्ही मशरूम पास्ता बनवून खायला देऊ शकता. मशरूम खाणे आरोग्यासाठी फायेदशीर असते. तसेच यात असलेले घचक आरोग्यासाठी पोषक असतात. मशरूम पास्ता बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया मशरूम पास्ता कसा बनवतात.

मशरूम पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दोनशे पंचवीस ग्रॅम तुमच्या आवडीचा पास्ता

२ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल

१ छोटा बारीक चिरलेला कांदा

२ किसलेल्या लसूण पाकळ्या

२२५ ग्रॅम चिरलेले मशरूम

१ टीस्पून ओरेगॅनो

चवीनुसार मीठ आणि मिरपूड

१२० मिली व्हेजिटेबल स्टॉक

१२० मिली हेवी क्रीम

अर्धा कप किसलेले चीज

गार्निशसाठी ताजी कोथिंबीर

मशरूम पास्ता बनवण्याची कृती

मशरूम पास्ता बनवण्यासाठी सर्वात आधी पाकिटावर दिलेल्या सुचनांनुसार पास्ता शिजवून घ्यावा.

शिजल्यावर पाणी काढून टाकून बाजूला ठेवावा.

एका मोठ्या कढईत ऑलिव्ह ऑईल मध्यम आचेवर गरम करावे.

त्यात चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतावे.

मग किसलेला लसूण घालून तो सुवासिक होईपर्यंत सुमारे तीस सेकंद परतावे.

त्यात चिरलेले मशरूम, वाळलेल्या ओरेगॅनो, मीठ आणि मिरपूड घालावे.

मशरूम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवावेत.

मग त्यात व्हेजिटेबल स्टॉक घालून उकळी येऊ द्यावी.

आणखी एक-दोन मिनिटे शिजू द्यावे.

आच कमी करून हेवी क्रीम घालावे.

आणखी २-३ मिनिटे उकळावे.

मग शिजवलेला पास्ता घालून छान एकजीव करावे आणि गरमागरम पास्ता सर्व्ह करावा.

टीप - दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण २-४ व्यक्तींसाठी पास्ता होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: देशी गायी 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का, भाजपने फोडली अजित पवारांची राष्ट्रवादी, 'हा' आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश!

IND vs BAN T20I : सूर्याच्या टीमला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; स्टार खेळाडूला दीड वर्षानंतर बोलावले

Cabinet Meeting: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ अन्...

Sharad Pawar: बालेकिल्ल्यावर पवार मिळवणार पुन्हा विजय? राजन पाटलांनंतर, आमदार बबन शिंदे दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT