Gardening Tips esakal
लाइफस्टाइल

Gardening Tips : झाडांसाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशक स्प्रे, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले येतील कामी

झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली की, झाडे छान बहरतात आणि हिरवीगार दिसतात. झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी झाडांना नियमित पाणी घालण्यासोबत, खत देखील घालावे लागते.

Monika Lonkar –Kumbhar

Gardening Tips : झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली की, झाडे छान बहरतात आणि हिरवीगार दिसतात. झाडांची काळजी घेणे म्हणजे झाडांना फक्त पाणी घालणे असे होत नाही.

झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी झाडांना नियमित पाणी घालण्यासोबत, खत देखील घालावे लागते. त्यासोबतच, कीटकनाशकांची फवारणी देखील करावी लागते. जेणेकरून झाडांना कोणतीही कीड लागणार नाही.

अनेक जण मार्केटमध्ये मिळणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करताना दिसतात. मात्र, या कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. त्यामुळे, यांचा वापर जास्त प्रमाणात करणे हे झाडांसाठी धोकादायक ठरू शकते.

मात्र, तुम्ही स्वयंपाकघरातील मसाल्यांपासून घरच्या घरी वनस्पतींसाठी कीटकनाशकांचा स्प्रे तयार करू शकता. कोणते आहेत हे मसाले? चला तर मग जाणून घेऊयात.

हळद

हळदीला अतिशय औषधी मानले जाते. स्वयंपाकघरासोबतच हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये हळदीचा वापर आवर्जून केला जातो. झाडांसाठी देखील हळद फायदेशीर आहे.

वनस्पतींना रोगमुक्त करण्यासाठी आणि झाडांच्या चांगल्या वाढीसाठी हळद अतिशय लाभदायी आहे. झाडांजवळची जमिन पुन्हा सुपीक करण्यासाठी तुम्ही खुरपणी करताना हळदीचा वापर करा. त्यासोबतच झाडांवर हळदीचे पाणी कीटकनाशकांप्रमाणे फवारा, यामुळे, झाडांना कीड लागणार नाही आणि झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल.

हिंग

स्वयंपाकघरात हळदीसोबतच हिंगाचा देखील आवर्जून वापर केला जातो. हिंगामुळे खाद्यपदार्थांना चव येते. आपल्या आरोग्यासोबतच हिंग वनस्पतींसाठी देखील फायदेशीर आहे.

वनस्पतीला रोगमुक्त करण्यासाठी आणि कीड लागू नये, यासाठी तुम्ही हिंगाच्या पाण्याचा प्रभावीपणे वापर करू शकता. यासाठी स्प्रे बॉटल घ्या आणि त्यात हिंगाचे पाणी घालून याची फवारणी झाडांवर करा.

तुम्ही कंपोस्ट खतामध्ये हिंगाचे पाणी मिक्स करून हे खत झाडांना घालू शकता. यामुळे, झाडांचे कीडीपासून रक्षण होईल आणि झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होईल. मात्र, हिंगाचा मर्यादित प्रमाणात वापर करायला विसरू नका.

लसूण

लसणामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. हे पोषकघटक आणि गुणधर्म कीटकांना दूर ठेवण्याचे काम करतात. झाडांचा कीडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही लसणाचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता.

यासाठी लसणाची साले पाण्यात टाकून हे मिश्रण काही दिवस साठवून ठेवा. त्यानंतर, या पाण्याचा वापर तुम्ही कीटकनाशक स्प्रे म्हणून झाडांवर करू शकता. शक्यतो इन-डोअर झाडांवर तुम्ही या लसणाच्या पाण्याची फवारणी करू शकता. यामुळे, झाडांचे कीडीपासून रक्षण होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT