Potato Paneer Shots Recipe  esakal
लाइफस्टाइल

Potato Paneer Shots Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत अन् चवदार बटाटा पनीर शॉट्स, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

Potato Paneer Shots Recipe : पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्याला काही तरी क्रिस्पी आणि चवदार खाण्याची सगळ्यांची इच्छा होते.

Monika Lonkar –Kumbhar

Potato Paneer Shots Recipe : पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्याला काही तरी क्रिस्पी आणि चवदार खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. नेहमीचे नाश्त्याचे पदार्थ या दिवसांमध्ये खायला बोअर होते. त्यामुळे, पोहे, उपमा, इडली आणि शिऱ्याला पर्याय म्हणून तुम्ही बटाट्यापासून एक पौष्टिक नाश्ता बनवू शकता.

या पदार्थाचे नाव आहे बटाटा पनीर शॉट्स. हे चवीला कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतात. सकाळच्या गडबडीत नाश्त्याला बनवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हे बटाटा पनीर शॉट्स तुम्ही घरच्या घरी आरामात बनवू शकता. शिवाय, हा पदार्थ बनवायला तुम्हाला फार साहित्याची गरज पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात बटाटा पनीर शॉट्सची ही सोपी रेसिपी.

बटाटा पनीर शॉट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २ उकडलेले बटाटे

  • पनीर क्यूब १ कप

  • आले लसूणाची पेस्ट १ चमचा

  • जिरे-मोहरी १ चमचा

  • लाल तिखट १ चमचा

  • हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली

  • बेसन १ कप

  • तळण्यासाठी तेल १ कप

  • चवीनुसार मीठ

बटाटा पनीर शॉट्स बनवण्याची सोपी पद्धत :

  • बटाटा पनीर शॉट्स बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या.

  • त्यानंतर, त्यात आले-लसूणाची पेस्ट घालून मिक्स करा.

  • दुसऱ्या बाजूला पनीरचे तुकडे करून घ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  • त्यानंतर, एका बाऊलमध्ये बेसन घ्या आणि त्यात लाल तिखट, मीठ घाला.

  • आता त्यात पाणी मिसळून मिश्रण चांगले घट्ट बनवून घ्या.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात तेल घाला.

  • तेल गरम झाले की त्यात जीरे-मोहरी घाला.

  • जिरे-मोहरी तडतडली की त्यात बटाट्याचे मिक्स केलेले मिश्रण घाला.

  • त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले परतून घ्या.

  • हे मिश्रण चांगले परतले की, ते थंड करायला ठेवा.

  • आता या बटाट्यापासून छोटे गोळे बनवा.

  • आता या गोळ्यांच्या मधोमध पनीरचा क्यूब घाला.

  • त्यानंतर, गॅसवर पॅन गरम करायला ठेवा आणि त्यात तळण्यासाठी तेल घाला.

  • आता बटाट्याचे गोळे बेसनाच्या मिश्रणात बुडवून घ्या आणि तेलात तळून घ्या.

  • हे गोळे सोनेरी होईपर्यंत छान तळून घ्या.

  • आता तुमचे बटाटा पनीर शॉट्स खायला तयार आहे, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT