how to make stuffed paratha without breaking follow tips 
लाइफस्टाइल

Kitchen Tips: स्टफिंग पराठा बनवताना सारण बाहेर निघतं का? फॉलो करा 'या' टिप्स

सकाळ डिजिटल टीम

नाश्त्यासाठी पराठा हा नेहमीच बेस्ट पर्याय आहे. कारण त्यामुळे पोटही भरते आणि शरीराचे योग्य पोषणही होते. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे घरी बनवले जातात. पण या पराठ्यामध्ये विशेष म्हणजे स्टफ पराठा हा सर्वांच्या आवडीचा ठरतो. (how to make stuffed paratha without breaking follow tips)

स्टफ पराठा करण्यासाठी बऱ्याचदा आपण आलू, पनीर, चीझ अथवा मिक्स व्हेजचा वापर करतो. ज्यामुळे शरीराला निरनिराळ्या भाज्या आणि त्यातील पोषकमुल्य मिळतात. ज्या भाज्या घरात खाल्ल्या जात नाहीत अशा भाज्या स्मॅश करून पराठ्यामध्ये स्टफ करता येतात.

पण अनेकवेळा स्टफ पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येत? ज्यामुळे मूड खराब होतो अन् पराठाही. तुमच्याही बाबतीत असं घडलेच असेल. हो ना? म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत स्टफ पराठा बनवण्यासाठी काही ट्रिक्स.

  • पराठ्यासाठी कणीक मळताना फक्त गव्हाच्या पीठाचा वापर करू नये त्यामध्ये थोड्या प्रमाणात मैदादेखील मिसळावा. ज्यामुळे कणीक लवचिक बनते आणि पराठा फुटत नाही.

  • कणिक मळताना जास्त पातळ किंवा जास्ट घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • स्टफिंगमध्ये जास्त मीठ झालं तर त्याला पाणी सुटून पराठा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ अधिक होणार नाही याची दक्षता घ्या.

  • पराठ्यासाठी कणकेच्या गोळ्याची खोलगट पारी करुन घ्या. त्यानंतर त्यात स्टफ भरा. पण स्टफिंग भरताच पराठा लाटण्यास सुरूवात करू नये. आधी हाताने त्या पीठाच्या गोळ्याला थापून घ्यावे गोलाकार आकार आणि स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित पसरले आहे याची खात्री झाल्यावर पीठावर पराठा लाटण्यास घ्यावा.

  • पराठा लाटताना तो आधी काठाकडील भागाकडून मध्यभागाकडे लाटण्यास सुरूवात करावी. ज्यामुळे काठाकडील भाग व्यवस्थित लाटला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT