तुम्हाला माहितीये का पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे तुमच्या दागिन्यांवर हानिकारक परिणाम होतो? मग ते सोन्या-चांदीचे दागिने असो की, मौल्यवान मोती किंवा चमकदार हिरे असो, सर्वांना पावसाळ्यात काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असते.(How to protect your precious jewelry during monsoon)
वातावरणात बदल झाल्यानंतर त्याचा परिणाम दागिण्यांवर होऊ नये. तसंच या काळात दागिण्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी सराफ बाजारातील काही जाणकारांनी महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत .
हिरे :
हिऱ्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोचण्याची शक्यता कमी असल्याने, सहसा कोणीही वारंवार त्यांचा वापर करतात. पण दररोज हिऱ्याच्या दागिने वापल्यामुळे त्यांची धूळ आणि आर्द्रतेच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांची चमक कमी होऊ शकते. त्यामुळे दागिन्यांचा संपूर्ण लूक खराब होऊ शकतो आणि आपल्या ते महागात पडू शकते. तुमच्या मौलव्यान आणि महागड्या हिऱ्यांच्या दागिन्यांची काळजी घेताना साबण आणि पाण्याचे मिश्रण वापरून ते हळूवारपणे स्वच्छ करावे किंवा मऊ ओलसर कापडाने पुसून घ्यावेत.
चांदी
चांदीचे ऑक्सिडेशन आणि नुकसान सहज होऊ शकते. ऑक्सिडायझेशन बर्याचदा चांदीच्या दागिन्यांना काळ्या रंगात बदलतात आणि त्यांचे आकर्षण कमी करतात. हवेतील आद्रता या काळात वाढल्यामुळे असे दागिन्यांना गंज लागण्याची शक्यता असते. तुम्ही ऑक्सिडायझड चांदीचे दागिने चमकविण्यासाठी टुथपेस्टचा वापर करू शकता. तुम्ही मऊ कॉटनचा कपडाही वापरु शकता. तसेच चांदीच्या वस्तूंचे रक्षण करण्यासाठी लोक चांदीचा उतारा (कलई) देखील लागू करु शकतात. संरक्षणाचे तंत्र काहीही असले तरी पाण्याशी कोणताही संपर्क टाळण्यासाठी हा मुख्य नियम कायम आहे.
रत्न
मोती, कोरल, अंबर अशा अनेक खड्यांचा रत्नांमध्ये समावेश होतो. ही ऑरीगॅनिक आणि नाजूक स्वरूपाची वैशिष्ट्यांनूसार या रत्नांचे वर्गीकरण केले जाते. पावसाळ्यात तुम्ही रत्नांनी बनवलेल्या दागिन्यांच्या वस्तू घालण्याची प्लॅन असाल तर ते परफ्यूम किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पे्सच्या थेट संपर्कात येऊ नयेत याची खात्री करा, अन्यथा नुकसान अटळ आहे. म्हणून, रत्नांचा वापर करताना पुरेशी काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. हे दागिने अतिशय नाजुक असल्याने त्यांना स्क्रॅच जाऊ शकतो. असे नुकसान टाळण्यासाठी वेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळे रत्न साठवले पाहिजेत.
सोने आणि प्लॅटीनम
बऱ्याचदा सोन्याचे दागिने धुळीमुळे खराब होऊ शकतात. प्लॅटीनम दागिन्यांच्या बाबतीतही हे होऊ शकते. सोने आणि प्लॅटिनम हे तटस्थ(न्युट्रल) धातू असल्यामुळे त्यांकडे जास्त लक्ष द्यावे लागत नाही. तरीही पावसाळ्यात त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष्य करणे तुमच्या मौल्यावान दागिन्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते. दागिन्यांची मुळं चमक जपण्यासाठी सोने आणि प्लॅटीनम ज्वेलरीला साबण आणि पाण्याचे मिश्रण वापरून ते हळूवारपणे स्वच्छ करावे.
तुम्हाला तुमच्या सर्व दागिन्यांचे कलेक्शन व्यवस्थितपणे जपन ठेवा. दागिन्यांच्या बॉक्सची निवड करताना ते बाहेरून मजबूत आणि आतून मऊ असतील याची खात्री करा. दागिन्यांच्या प्रकारानुसार त्यांचे वर्गीकरण करावे. जास्त ओलावा शोषण्यासाठी सिलिका जेल पाउच बॉक्सच्या आत ठेवल्या पाहिजेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.