लाइफस्टाइल

वीट-साबणापासून बनवतायेत लाल तिखट? कशी ओळखाल भेसळ?

रासायनिक रंग आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

जास्त नफा मिळविण्यासाठी भेसळ करणारे हळद आणि तिखटामध्ये रसायनांचा वापर करतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. हळद आणि तिखटाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यामध्ये विविध गोष्टींची भेसळ केली जाते. पण, त्यातून त्यांचा दर्जा खराब होतो आणि त्याचे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात.

दूध, तूप, तेल, फळे आणि भाज्यांसह अन्नातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ होत आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी भेसळ करणारे त्यात रसायने वापरतात, जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या स्वयंपाकघरातील हळद आणि मिरची पावडरही त्यातून सुटली नाही. त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात भेसळ केली जाते आणि त्यातून त्याची गुणवत्ता खराब होते जे शरीरासाठी घातक आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडेच ग्राहकांना जागरूक करण्यासाठी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या हळदीमध्ये रासायनिक रंग वापरून भेसळ करणारे तिची गुणवत्ता खराब करू शकतात, असे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. रासायनिक रंग आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्याचप्रमाणे बाजारात उपलब्ध असलेल्या लाल तिखटामध्ये विटांची पूड, टार्क पावडर, साबण किंवा वाळू घालून टाकल्यास ती खराब होऊ शकते. त्यामुळे हे मसाले बाजारातून खरेदी करताना ग्राहकाने अत्यंत सावधगिरी बाळगावी. एफएसएसएआयने (FSSAI) व्हिडिओद्वारे ही फसवणूक टाळण्यासाठी मार्ग देखील शेअर केला आहे.

लाल मिरची खरी आहे की बनावट कसं ओळखावं?

भेसळ करणारे लाल मिरचीमध्ये वीट पावडर किंवा वाळू यासारख्या गोष्टी वापरतात. हे ओळखण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा लाल तिखट घाला. मिरचीला चमच्याने ढवळू नका. तिला काचेच्या तळापर्यंत पोहोचू द्या. यानंतर, भिजवलेली मिरची पावडर तळहातावर हलक्या हातांनी चोळा. जर चोळताना तुम्हाला खडबडीतपणा जाणवत असेल तर ती भेसळ आहे, हे समजून घ्या. जर तुम्हाला चिकटपणा जाणवत असेल तर समजून घ्या की, त्यात साबण पावडर वापरली आहे.

हळद खरी आहे की बनावट?

आपण हळदीच्या गुणवत्तेची चाचणी देखील घेऊ शकतो. यासाठी काचेचा ग्लास अर्ध्यापर्यंत पाण्याने भरा. यानंतर त्यात एक चमचा हळद घाला. जर हळद तळाशी पूर्णपणे स्थिर झाली आणि पाण्याचा रंग फिकट पिवळा झाला, तर त्यात कोणतीही तक्रार नाही. दुसरीकडे जर हळद पूर्णपणे स्थिरावली नाही आणि पाण्याचा रंगही खूप पिवळा झाला, तर त्यात भेसळ असल्याचं समजतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT