How To Relief From Neck Pain:  Sakal
लाइफस्टाइल

Neck Pain Home Remedies: एकसारखे मोबाईलकडे पाहून मान आखडलीय? मग हाताच्या अंगठ्याने करा मसाज, लगेच मिळेल आराम

पुजा बोनकिले

How To Relief From Neck Pain: तुमच्या मानेत वेदना आणि कडकपणा जाणवणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेक लोक मोबाईल, लॅपटॉपवर तासंतास काम केल्याने मानेच्या नसा आखडून जातात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. तसेच मानेपासून खांद्यापर्यंत वेदना सुरू होतात तर कधी डोकेदुखी वाढते. यासाठी हलक्या हाताने मसाज केल्यास आराम मिळू शकतो.

Neck Pain

पुढील तीन पद्धतीने मसाज करावी

मसाज 1

मान सतत एकाच स्थितीत राहिल्यामुळे स्नायूंमध्ये तणाव येतो आणि वेदनादायक ठिकाणी एक ढेकूळ जाणवू लागते. त्यामुळे या गाठी सोडणे आवश्यक आहे. जेणेकरून जडपणा दूर करता येईल. सर्वप्रथम, अंगठ्याच्या साहाय्याने, जिथे वेदना होत आहे त्या बिंदूवर हलके दाबा. साधारण दहा ते पंधरा वेळा दाबल्यानंतर सोडा.

Neck Pain

मसाज 2

यानंतर दोन्ही हातांचे अंगठे मानेच्या आणि पाठीच्या सुरुवातीला अगदी मध्यभागी ठेवा आणि दोन्ही खांद्यांना हलका दाब द्यावा आणि मसाज करा. साधारण दहा ते वीस वेळा असा मसाज करा.

Neck Pain

मसाज 3

तुमच्या मानेचा जो भाग दुखत आहे. तिथे अंगठ्याच्या साहाय्याने त्या भागावर दाब द्यावा आणि नंतर हळूहळू अंगठा खांद्यावर आणा. असे दहा ते वीस वेळा केल्याने मानेतील जडपणापासून आराम मिळतो आणि या ठिकाणी तयार झालेल्या गाठीही निघून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT