Married life Tips esakal
लाइफस्टाइल

Married life Tips : सेक्स वेदनदायी ठरतंय? असं निवडा योग्य ल्युब्रिकंट

सेक्स करताना वेदना होऊ नये म्हणून ल्युब्रिकंट वापरलं जातं. पण त्याचीही निवड योग्य करणे आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

How to Select Accurate Lubricant : हार्मोन्समुळे शरीरात बरेच बदल होत असतात. त्यामुळे ल्युब्रिकेशन कमी होऊ शकतं. याचा त्रास मुलींमध्ये जास्त होत असल्याचं दिसून येतो. शारीरिक संबंधांदरम्यान वेदना, जळजळ होते. याची बरीच कारणं असू शकतात. अशा परिस्थितीत बाहेरून ल्युब्रिकंटचा वापर केला जातो. ल्युब्रिकंट बऱ्याच प्रकारचे असतात, पण त्याची योग्य निवड करणं आवश्यक असतं.

lubricant

काय काळजी घ्यावी?

कंफर्ट लक्षात घ्यावा

बऱ्याचदा ल्युब्रिकंट हे जेल फॉर्ममध्ये असतात. सगळेच ल्युब्रिकंट सगळ्यांनाच सुट होत नाहीत. काहींमुळे खास सुटू शकते. त्यामुळे ल्युब्रिकंटची निवड करताना आपला कंफर्ट लक्षात घ्यावा.

आरोग्यासाठी सुरक्षित असावे

बऱ्याचदा काही कंडोम्सला तेल सदृश ल्युब्रिकंट चालत नाहीत. त्यामुळे कंडोम खराब होण्याची शक्यता असते. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता असते. शिवाय काही ल्युब्रिकंट आणि मॉईश्चरायझर योनीच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

lubricant

पीएच लेव्हल लक्षात घ्यावी

ल्युब्रिकंट निवडताना योनीच्या पीएचच्या जवळपास पीएच असणारा ल्युब्रिकंट निवडावा. साधारण ३.८ ते ४.५ च्या दरम्यान पीएच असावा. जर पीएच जास्त असेल तर इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

ऑस्मोलॅलिटी लेव्हल

ऑस्मोलॅलिटी लेव्हल कमी अधिक झाली तरी संसर्ग होऊ शकतो. ऑस्मोलॅलिटी लेव्हल पेशींमधला ओलावा शोषून घेतात. त्यामुळे ड्रायनेस वाढतो. त्यामुळे आराम मिळण्याऐवजी त्रास वाढतो. शिवाय टिश्यू डॅमेज होतात.

पाणीयुक्त किंवा सिलिकॉनयुक्त ल्युब्रिकंटचा वापर

ल्युब्रिकंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात पाणीयुक्त किंवा सिलिकॉनयुक्त ल्युब्रिकंटचा वापर योनी सेक्ससाठी उपयुक्त ठरतो. ४.५ पीएच चे ल्युब्रिकंट योनी सेक्स साठी तर ५.५ ते ७ पीएचचे ल्युब्रिकंट अॅनल सेक्ससाठी वापरावे असा सल्ला WHO द्वारा देण्यात येतो. अॅनल सेक्ससाठी आणि कंडोम सुरक्षित ठेवण्यासाठी सिलिकॉन बेस्ड ल्युब्रिकंट सगळ्यात चांगला असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT