how to store fresh ginger in rainy season  how to store fresh ginger in rainy season
लाइफस्टाइल

पावसाळ्यात आलं जास्त दिवस टिकण्यासाठी काय कराव? घ्या जाणून

आलं पावसात भिजल्यामुळे सडतं आणि खराब होतं. बऱ्याचदा अशा आल्यावर बुरशी जमा होते. यासाठीच

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा सुरु झाला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अगदी तब्येतीपासून ते फ्रिजमधील भाज्यांपर्यंत. याच भाज्यांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आल्याची. कारण आलं खराब होण्याची शक्यता जास्त असते. आलं पावसात भिजल्यामुळे सडतं आणि खराब होतं. बऱ्याचदा अशा आल्यावर बुरशी जमा होते. यासाठीच पावसाच्या दिवसांमध्ये आलं टिकवणं म्हणजे मोठं काम. तर जाणून घेऊयात पावसाळ्यात आलं जास्त दिवस टिकण्यासाठी काय कराव?(how to store fresh ginger in rainy season)

पावसात आल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आलं हे बहुगूणी आहे. चहाच काय पावसात अनेक पदार्थांमध्ये अगदी सर्दी खोकल्याच्या काढ्यातही आल्याचा वापर केला जातो.

तर पावसाळ्या आलं जास्त दिवस कसं टिकवाल

  • आलं बाजारातून आणल्यावर पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करा. ज्यामुळे त्याला लागलेला चिखल अथवा माती निघून जाईल.

  • त्यानंतर एका सुती कापडावर आलं सुकवा. त्यामुळं काही दिवस आलं टिकवू शकता.

  • आल्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून तुम्ही आलं फ्रीजमध्ये काही दिवस टिकवून ठेवू शकता.

  • जर आलं खुप ओलंसर असेल तर त्याच्या साल काढून त्याचे काप करा अन् फ्रिजमध्ये ठेवा.

  • उन्हाळ्यात आलं सुकवून त्याची पावडर करून ती देखील तुम्ही पावसाळ्यात चहा अथवा स्वयंपाकात वापरू शकता.

  • भिजलेल्या आल्याची चव कमी होते त्यामुळे आलं सुकवून वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.

आल्याचे फायदे

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आल्याचं सेवन महत्त्वपूर्ण ठरतं.

कच्च्या आल्याचे सेवन केल्याने पचनक्रियाही निरोगी ठेवता येते.

आल्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. आले खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप पोटदुखी होते. अशावेळी आल्याचे सेवन करावे.

आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT