Parenting Tips sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: नोकरी करत असलेल्या पालकांनी अशी घ्यावी बाळाची काळजी, जाणून घ्या

आई-वडील दोघेही नोकरी करत असतील, तर ही जबाबदारी थोडी अवघड होऊन बसते.

Aishwarya Musale

आयुष्यात आपल्या बाळाला जन्म दिलेला दिवस हा तुमच्यासाठी सर्वात सुंदर आणि खास दिवस असतो. पहिल्यांदा पालक झालेल्या आई-बाबांसाठी हा दिवस खूप खास असतो. आई-बाबा झालेल्या जोडप्यांच्या आयुष्यात एक नवं सदस्य येतो. यावेळी काही नव्या जबाबदाऱ्याही येतात. ज्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या बाळाची काळजी घेणे. आई-वडील दोघेही नोकरी करत असतील, तर ही जबाबदारी थोडी अवघड होऊन बसते.

यावेळी ही जबाबदारी केवळ आईची नाही तर बाळाचं बालसंगोपन करणे हे वडिलांचीही तितकीच जबाबदारी आहे. समजूतदारपणाने तुम्ही तुमच्या बाळाची चांगली काळजी घेऊ शकता. यासाठी आज आम्ही काही सोप्या टिप्स आणल्या आहेत, ज्या फॉलो करून तुम्ही काम करत असतानाही बाळाची चांगली काळजी घेऊ शकता.

आजी-आजोबांकडे सोडा

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि नुकतेच पालक झालेले असाल, तर तुमच्या बाळाची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बाळाचे आजी-आजोबा. त्यांच्या उपस्थितीत, तुम्ही कसलीही चिंता न करता बाळाला सोडून आपल्या कामावर जाऊ शकता.

रुटीन तयार करा

तुम्हाला बाळ झाल्यानंतर ऑफिसमध्ये रुजू झालात, तर सर्वप्रथम स्वत:चा एक रुटीन तयार करा. कोणते काम किती वेळात पूर्ण करायचे आहे ते ठरवा. अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट स्वतःच अनेक समस्या सोडवेल.

बाळाचे सामान व्यवस्थित ठेवा

बाळाचे सामान व्यवस्थित ठेवा. गरज भासल्यास प्रत्येक छोट्या वस्तूसाठी स्वतंत्र बॉक्स तयार करा. जेणेकरून आपल्याला जास्त गोष्टींचा शोध घेण्याची आणि आपला वेळ वाचवण्याची गरज भासणार नाही.

वडीलही सहकार्य करतात

बाळाची काळजी घेण्याची जबाबदारीही वडिलांचीच आहे. बाळाची काळजी घेण्यासाठी वडील आपल्या जोडीदाराला मदत करतात. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या वडील सहज करू शकतात. एकट्या आईला इतकं सगळ करणं फार कठीण असतं, हे वडिलांनी समजून घ्यावं.

बाळाच्या हालचाली वेळोवेळी जाणून घ्या

जर बाळ इथे एखाद्या नातेवाईकाबरोबर किंवा त्यांच्या घरात असेल तर, बाळाची काळजी घेण्यासाठी कोणी आलं असेल तर तुम्ही त्या मुलाच्या संपर्कात राहा. दिवसातून किमान तीन-चार वेळा बाळाच्या हालचाली जाणून घ्या आणि तुमचं ऑफिस जवळ असेल तर तुम्ही दिवसातून एकदा बाळाला भेटायला येऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT