How To Take Care your mobile in Rainy Season 
लाइफस्टाइल

Monsoon Tips: पावसात फोन भिजला? टेन्शन नका घेऊ, या टीप्स करा फॉलो

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या घडीला मोबाईल हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाईल नाही तर जीव नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण पावसाळ्यात या जीवाची म्हणजे मोबाईलची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.

पावसाळ्यात अनेकदा आपण कुठे फिरायला किंवा ट्रेकींगला जाताना मोबाईलची विशेष काळजी घ्यावी लागते. यावेळी कितीही काळजी घेतली तरी आपला मोबाइल पाण्यात भिजतोच. बरेचदा जोरदार पाऊस असेल तर सगळी काळजी घेऊनही गाडीवरुन ऑफीसमधून घरी-येताना किंवा चालत असू तरीही फोन पावसाच्या पाण्यात पूर्ण भिजतो. पण टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही काही टीप्स देत आहोत.(How To Take Care your mobile in Rainy Season )

मोबाईल स्विच ऑफ करा

तुमचा मोबाईल पावसाचा भिजला तर तुम्ही सर्वात प्रथम तो स्विच ऑफ करा. त्यानंतर एखादे सुती कापड किंवा टॉवेल, नॅपकीन घेऊन हा मोबाईल बाहेरच्या बाजूने चांगला कोरडा करुन घ्या.

तांदळामध्ये ठेवा मोबाईल

एका हवाबंद पिशवीत तांदूळ भरा आणि त्यात तुमचा मोबाईल ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतो आणि तुमचा मोबाईल कोरडा होण्यास मदत करतो. कमीतकमी 24-48 तास तुमचा मोबाईल तांदळामध्ये ठेवा.

सिलिका जेल पॅकचा वापर

सिलिका जेल पॅक ओलावा शोषून घेण्यासाठी तांदळापेक्षा अधिक प्रभावी आहेत. तुमच्याकडे सिलिका जेल पॅक असल्यास, ते मोबाईलसह कंटेनरमध्ये ठेवा.

व्हॅक्यूम क्लिनर वापरा पण काळजी घ्या

तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर असल्यास, ते मोबाईल जवळ ठेवा जेणेकरून ते ओलावा बाहेर काढू शकेल. परंतु लक्षात ठेवा की, व्हॅक्यूम क्लिनरचे नोजल थेट मोबाईलच्या जवळ नसावे, यामुळे अंतर्गत सर्किट खराब होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - टीआरपी क्वीन निक्की तांबोळी घराबाहेर; निक्कीचा बीबीमराठी ५चा घरातला प्रवास संपला

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT