Hair Care Tips : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे, आवश्यक आहे. संतुलित आहारामध्ये व्हिटॅमिन्स, कर्बोदके आणि फायबर्सचा समावेश असणे महत्वाचे आहे. या व्हिटॅमिन्सपैकी महत्वाचे असलेले व्हिटॅमिन ई हे आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
व्हिटॅमिन ई हे केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. जेव्हा आपण व्हिटॅमिन ई चा केसांवर वापर करतो, तेव्हा केसांना मजबूती मिळण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई मध्ये उपलब्ध असलेले अँटिऑक्सिडंट्स केसांचा पोत सुधारण्याचे काम करतात.
शिवाय, या व्हिटॅमिनमध्ये आढळून येणारे फॅट्स हे केसांना अतिनील किरणांच्या प्रभावापासून दूर ठेवण्याचे काम करते. मध, ऑलिव्ह ऑईल किंवा केळीमध्ये व्हिटॅमिन ई मिक्स करून केसांवर लावले जाते. आजकाल व्हिटॅमिन ई च्या टॅब्लेट्स देखील मिळतात. आज आपण व्हिटॅमिनी ई केसांना लावल्यावर कोणते फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
केसांमधील कोरड्या त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई चा वापर करणे हे फायदेशीर ठरते. जेव्हा केसांवर व्हिटॅमिन ई लावले जाते तेव्हा स्काल्पमध्ये येणारी खाज, जळजळ रोखण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन ई चा केसांवर वापर केल्याने स्काल्पमधील तेल नियंत्रित राहण्यास मदत होते. (keeping the scalp moisturized)
केसांमध्ये व्हिटॅमिन ई चा वापर केल्याने स्काल्पचा ऑक्सिडेटिव्ह तणावापासून बचाव केला जाऊ शकतो. शिवाय, व्हिटॅमीन ई मुळे केसांचा पोत सुधारण्यास ही मदत होते आणि केसांची ताकद वाढते. केसांचा पोत सुधारल्यामुळे आणि केस मजबूत झाल्यामुळे केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि केसगळतीचे प्रमाण आपोआप कमी होते. (Hair loss will be reduced)
हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केस गळणे, केस तुटणे आणि केसांमध्ये कोंडा निर्माण होणे इत्यादी समस्या सुरू होतात. या समस्या देखील सामान्य आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी व्हिटॅमिन ई हे अतिशय प्रभावी आहे.
केसांचा पोत खराब झाल्यावर केसांची चमक कमी होऊ लागते. त्यामुळे, अशा स्थितीमध्ये केसांवर व्हिटॅमिन ई लावल्याने केसांना योग्य पोषण मिळते आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. (shiny hairs)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.