Hygiene Tips For Women esakal
लाइफस्टाइल

Hygiene Tips For Women : प्रत्येक महिलेला शारीरिक स्वच्छतेच्या या गोष्टी माहिती असायलाच हव्यात!

काही महिला बॉडी शेप चांगला दिसावा म्हणून टाईट पॅन्ट घालतात

Pooja Karande-Kadam

Hygiene Tips For Women :  

शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेणे हे प्रत्येकासाठीच गरजेची बाब आहे. विशेषकरून महिलांनी ही गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे. पण, महिलांच्या शरीराबाबत चालत आलेल्या रूढी, परंपरा आजही पाळल्या जातात. काही आदीवासी जमातींमध्ये तर महिलांच्या शरीराचे अक्षरश: हाल केले जातात.

महिलांना महिन्याला येणारी पाळी, अंगावरून पांढरे जाणे, सेक्स यामुळे महिलांच्या शरीरात घाण साचते. तसेच, अंघोळीवेळी योग्य प्रकारे शरीराची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आजही शरीरावरील अतिरिक्त केस काढणे हे चुकीचे मानले जाते. त्यामुळेही आजारांचा धोका बळावतो.

स्वच्छतेची काळजी न घेतल्याने महिलांच्या शरीरात बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. मासिक पाळी आणि योनीच्या आरोग्यातील अनेक बदलांमुळे महिलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. म्हणून, संपूर्ण शरीर स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चला आज या विषयावर बोलूया आणि जाणून घेऊया शरीराची स्वच्छता राखण्यासाठी महिलांनी कोणत्या टिप्स पाळल्या पाहिजेत.

प्रत्येक स्त्रीला या 5 स्वच्छता टिप्स माहित असणे आवश्यक आहे

वेळेवर पॅड बदलणे

मासिक पाळी दरम्यान, अनेक महिला दिवसभर एकच पॅड घालतात. पण यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. खरं तर, पाळीतील रक्त पॅडवर बराच काळ राहिल्यास, त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे योनिमार्गात संसर्ग देखील होऊ शकतो. म्हणून, दर 4 ते 6 तासांनी पॅड बदला.

खूप घट्ट पँट घालू नका

काहीवेळा शेप चांगला दिसाला यासाठी काही महिला हट्टाने घट्ट पँट घालतात. ज्यामुळे योनी आणि मांड्यांमध्ये घाम येतो. यामुळे तुम्हाला जिवाणू संसर्गाचा धोका होऊ शकतो , ज्यामुळे खाज देखील होऊ शकते. त्यामुळे जास्त काळ घट्ट कपडे घालू नका. विशेषत: पीरियड्स दरम्यान घट्ट कपडे घालू नका, अन्यथा यामुळे क्रॅम्प्स देखील होऊ शकतात.

कोरड्या त्वचेवर रेझर वापरू नका

केस काढल्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. त्वचेवर रेझर वापरताना बरेच लोक खबरदारी घेत नाहीत, जसे की त्वचेला योग्य प्रकारे हायड्रेट न करणे किंवा केस काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझ न करणे. यामुळे तुमच्या त्वचेत खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते.

ओल्या अंगावर कपडे घालू नका

अनेक वेळा आपण आंघोळीनंतर अंग नीट न पुसता कपडे घालतो. यामुळे तुम्हाला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. कारण ओलाव्याच्या संपर्कात आल्याने शरीरात खाज येऊ शकते. यामुळे, तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते, म्हणून आंघोळीनंतर तुमचे शरीर पूर्णपणे पुसून टाका.

स्तन मॉइश्चराइझ ठेवा

शरीराची स्वच्छता राखताना आपण स्तनांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्तनांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की आंघोळीनंतर तुम्ही तुमचे शरीर पूर्णपणे पुसले पाहिजे, जेणेकरून संसर्गाचा धोका नाही. तसेच, आंघोळीनंतर आपल्या स्तनांना मॉइश्चराइझ करण्यास विसरू नका. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT