actress amruta khanvilkar sakal
लाइफस्टाइल

मी साहसप्रेमी

माझे छंद खरंतर खूप आहेत; पण त्यांच्याकडे मी फक्त छंद म्हणून पाहत नाही, तर त्यातून मी सतत काहीतरी नवीन शिकत असते.

अमृता खानविलकर

माझे छंद खरंतर खूप आहेत; पण त्यांच्याकडे मी फक्त छंद म्हणून पाहत नाही, तर त्यातून मी सतत काहीतरी नवीन शिकत असते. मला तंदुरुस्त राहायला फार आवडतं. त्यासाठी मी योगाभ्यास करते. माझं मन योगाभ्यासात रमतं आणि आता त्याच्या मी काही परीक्षाही देत आहे. मला इंग्रजी साहित्यातही रुची आहे. त्यातही मी पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या विचारात आहे. म्हणजे मी माझ्या कोणत्याही छंदाकडे केवळ फावल्या वेळात करायची गोष्ट म्हणून पाहत नाही.

मला असं वाटतं, की कोणताही छंद केवळ विरंगुळाच नव्हे, तर काहीतरी नवीन शिकवणारा असायला हवा. मला फाईन आर्ट्‌सची आवड आहे. त्यामुळे मी एलिमेंटरी, इंटरमिजिएटच्या परीक्षाही दिल्या आहेत. थोडक्यात काय, तर छंदाचं रूपांतर काहीतरी शिकण्यात झालं, की मला त्यातून आनंद मिळतो. आज मला नृत्य आवडतं आणि त्यात मी करिअर केलं; पण खऱ्या अर्थानं छंद म्हणायचं झालं तर फिरणं आणि काहीतरी ॲडव्हेंचर करणं.

मी नुकतीच सांदण व्हॅलीला गेले होते. तिथे मी विविध क्रीडाप्रकार केले. मला स्कूबा डायव्हिंगही खूप आवडतं, मला स्नॉर्केलिंगही आवडतं. खरंतर माझ्या घरी कोणालाही अशा प्रकारच्या क्रीडा प्रकारांची किंवा स्कूबा डायव्हिंगची आवड नाही; पण मला ती आवड निर्माण झाली आणि आज मी ती जोपासते आहे. मला एखाद्या ठिकाणी स्कूबा डायव्हिंगसाठी जायचं असतं, तेव्हा मी त्याबद्दल संपूर्ण माहिती घेते, चौकशी करते.

अगदी चोख नियोजन करते आणि मगच समुद्रात उतरते. त्यामुळे माझी काही विशेष फजिती झालेली नाही; पण त्यातल्या त्यात एक थरारक अनुभव सांगायचा झाला, तर माझ्यासमोर एकदा चक्क शार्क मासा आला होता. अथांग खुला समुद्र आणि त्यात समोर आलेला शार्क या दृश्यामुळे अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला होता. मला खूप जास्त भीती वाटली होती.

छोटे छोटे मासे दिसणं ठीक होतं; पण थेट शार्कसारखा मासा समोर येणं म्हणजे अगदीच भीतीदायक होतं. त्यात मी अगदी मानेपर्यंत पाण्यात बुडालेली होते. तो शार्क पाहून मी अक्षरशः किनाऱ्याकडे धावत सुटले होते. तेव्हा मला लोक दिलासा देत होते, की तो काही करणार नाही. मात्र, एवढा भव्य मासा समोर आलेला पाहून भीती वाटणारच ना! तशीच काहीशी माझी तेव्हा अवस्था झाली होती.

मी जेव्हा जेव्हा बाहेर कुठं फिरायला जाते आणि तिथं स्कूबा डायव्हिंग असेल, तर ते मी नक्कीच करते. मी मॉरिशसमध्येही केलेलं आहे; पण स्कूबा डायव्हिंग हल्ली महाराष्ट्रात तारकर्लीलाही होतं. त्यासाठी बाहेरच्या देशांत जाण्याची गरज राहिलेली नाही; पण जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा तेव्हा मी नक्कीच स्कूबा डायव्हिंग करते. स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण घ्यायला मला नक्कीच आवडेल. समुद्रातलं जग खूप सुंदर आहे, मला त्यात आणखी खोलात जाऊन शिकायचं आहे, त्यातले बारकावे जाणून घ्यायचे आहेत. त्यामुळे मी भविष्यात नक्कीच स्कूबा डायव्हिंग कोर्स करेन.

अर्थात आता ही गोष्ट मी किंवा इतर कोणीही सतत करू शकत नाही; पण मला एवढंच वाटतं, की प्रत्येकाला कोणतातरी छंद असायला हवाच. तुम्ही तुमच्या छंदाला वेळ दिला नाही, तर तुम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही असं म्हणावं लागेल. छंद आपल्या आयुष्याला अर्थ देतात. त्यामुळे प्रत्येकाने छंद जोपासायलाच हवेत.

(शब्दांकन - वैष्णवी कारंजकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मनसे नेते अमित ठाकरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Baramati Assembly Election : बारामतीकर साहेबांना साथ देतील; युगेंद्र पवार यांचा विश्वास

EVM Issues In Pune: "आम्ही चुकलो तर कारवाई, मग तुमचं काय?"; पुण्यात EVM मशीनमध्ये बिघाड, कोथरुडमधील युवतीचा आक्रमक सवाल

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

SCROLL FOR NEXT