लोक डायटवर असतील तर सगळे पदार्थ खाण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागते. कारण आरबट-चरबट, गोड पदार्थ वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे, आवडत्या गोड पदार्थ खाणे बंद करावे लागते.
वेट लॉससाठी प्रयत्न करणारे लोक स्वत:चा एक डायट बनवून तो फॉलो करतात. पण हवामानानुसार उन्हाळ्यात थंडगार वाटण्यासाठी आईस्क्रीम खावं असंही त्यांना वाटत असेल. पण, आईस्क्रीममध्ये असलेल्या कॅलरीजमुळे वजन वाढते. (Weight Loss Tips)
तुम्ही एक पक्के आईस्क्रीम लव्हर असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोनची फिटनेस कोच यास्मीन कराचीवाला हिने एक रेसिपी शेअर केली आहे. जे आईस्क्रिम तुम्ही सहज घरी बनवू शकता. आणि ते खाऊन तुमचा डायट ब्रेक तर होणार नाही. उलट, तुमचे वजन कमी व्हायला मदतच होईल. (Diet Plan)
कसे बनवायचे हे आईस्क्रिम
यासाठी आपल्याला चार सफरचंद घ्यायचे आहेत. सफरचंद सोलून ती उकडून घ्या. उकडलेली सफरचंद एका भांड्यात घेऊन मॅश करून घ्या. त्यामध्ये मेल्टेड डार्क चॉकलेट, मॅपल सिरप घालून एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण आईस्क्रीम मोल्डमध्ये घालून त्यावर ड्रायफ्रूट्स घाला आणि फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. सेट झाल्यानंतर तुमचे आईस्क्रीम तयार आहे.
आईस्क्रीमसारखी गोड गोष्ट वजन कमी करण्याच्या डायटमध्ये कशी बसू शकते? सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टरच्या या खास रेसिपीमध्ये सफरचंदाचा वापर मुख्य घटक म्हणून करण्यात आला आहे.
सफरचंद गोड आणि निरोगी आहे. सफरचंदांसह, या निरोगी आइस्क्रीम रेसिपीमध्ये मॅपल सिरप, वितळलेले गडद चॉकलेट आणि अक्रोडाचे काही तुकडे वापरतो. याचे आपल्या शरीराला कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.