Identify Original Ghee esakal
लाइफस्टाइल

Identify Original Ghee: चकचकीत डब्यात भरून तुम्हाला विकलं जातंय बनावट तूप; देशी शुद्ध तूप ओळखायचं कसं?

Desi Ghee : तूप हे पॅकिंगमध्ये येते म्हणजेच ते विकत आणले जाते. असे तूप शुद्ध आहे की अशुद्ध हे कळत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Identify Original Ghee:

भारतीय खाद्य संस्कृतीत दूध, तूप, दही ताक सर्व गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच गोष्टी आपल्या शरीरासाठी फलदायी ठरतात. वरण-भात आणि साजूक तूप हे कॉम्बिनेशन तर प्रत्येकाचेच आवडते आहे. जेव्हा आपल्याकडे सात्विक भोजनाचा थाट मांडलेला असतो तेव्हा साजूक तूप हे असतच.

पूर्वी महिला घरोघरी दूध घेऊन त्यापासून तूप बनवायच्या. आत्ताचे तूप हे पॅकिंगमध्ये येते म्हणजेच ते विकत आणले जाते. असे तूप शुद्ध आहे की अशुद्ध हे कळत नाही. पण ते खाण्याचे अनेक तोटेही होऊ शकतात.

शुद्ध तूप कसे ओळखायचे हे पाहुयात.

गरम पाण्याचा वापर करा

देशी तूप शुद्ध आहे की नाही हे तपासण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे गरम पाण्यात तूप टाकणे होय. गरम पाण्यात तूप टाकल्याने तुम्हाला खरं खोट्याचा उलगडा होईल. गरम पाण्यात तूप टाकल्यानंतर तूप शुद्ध असेल तर ते पाण्यात वरती तरंगेल. आणि अशुद्ध असेल तर ते पसरून थोडे-थोडे तरंगेल.

तूपाचा रंग आणि दाटसरपणा

बनावटी तूपामध्ये अधिक चिकटपणा असतो. त्याचा रंग हा अधिक पांढरा असतो. तर शुद्ध तूप पिवळसर दिसतं आणि ते अधिक तेलकट नसते. त्यामुळे, तुम्हाला शुद्ध तूप ओळखायचे असेल तर ते बोटावर घेऊन पहा तुम्हाला ते जास्त तेलकट वाटणार नाही.

आयोडीनची तपासणी

आयोडीनने तपासणे हा कोणताही खाद्यपदार्थ तपासण्याचा एक चांगला मार्ग मानला जातो. तुपाची शुद्धता तपासण्यासाठी भांड्यात तूप टाकून त्यात आयोडीनच्या द्रावणाचे काही थेंब टाकून ते मिक्स करावे. काही वेळाने तपासून पाहा की तुपाचा रंग बदललेला असू शकतो. अशा प्रकारे तुम्ही भेसळयुक्त तूप तपासू शकता आणि आरोग्याची हानी टाळू शकता.

घरगुती तूप खरेदी करा

आजही गावागावात महिला घरगुती पद्धतीने बनवलेले शुद्ध तूप विकतात.तुम्हाला अधिक प्रमाणात तूप लागत असेल तर तुम्ही अशा महिलांना कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा तुम्हाला जर पॅकेटमधीलच तूप घ्यावे लागत असेल तर ते विश्वासार्ह्य कंपनीचेच घ्यावे. ज्यामध्ये भेसळ नसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT