tips how to use Apple Cider Vinegar  esakal
लाइफस्टाइल

वेट लॉस करण्यासाठी Apple Cider Vinegar पिताय ? उद्भवू शकतात या ५ गंभीर समस्या; असा करा बचाव

विनेगरचा जर का तुम्ही व्यवस्थित वापर केला नाही तर तुम्हाला समस्याही उद्भवू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

अनेक घरात सफरचंदाच्या विनेगरचा वापर केला जातो. हे विनेगर सफरचंदाच्या रसापासून तयार केल्या जातं. घरात बनणाऱ्या विविध व्यंजनांचा स्वाद वाढवण्यासाठीही ते वजन कमी करण्यापर्यंत Apple Cider Vinegar चे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या ड्रिंकला पावरफुल ड्रिंक असेही म्हटले जाते. यात विटॅमिन सोबत अनेक पोषक तत्व असतात. हे विनेगर अनेक रोगांविरूद्ध लढण्यास मदत करतात. मात्र या विनेगरचा जर का तुम्ही व्यवस्थित वापर केला नाही तर तुम्हाला समस्याही उद्भवू शकतात.

अँँपल साइडर विनेगर हे ब्लड शुगर कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी,कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी अशा अनेक समस्यांवर उपायकारक आहे. पण प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे असतात त्याचप्रमाणे अँपल साइडर विनेगरचेही काही तोटे आहेत. मात्र विनेगरचे तोटे तुम्हासा तेव्हा अनुभवायला मिळतील जेव्हा तुम्ही त्याचा योग्य उपयोग करणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकासाठी विनेगरचं योग्य प्रमाण, त्याचा योग्या वापर याबाबत माहिती असणे फार महत्वाचे ठरते.

विनेगरचे तोटे

होऊ शकतो गॅस्ट्रोपेरिसिस - अँपल साइडर विनेगर शरीरातील वाढत्या कॅलरीजला नियंत्रणात ठेवते. मात्र यामुळे गॅस्ट्रोपेरिसिस होऊ शकतो. या समस्येत पोटांच्या नसा व्यवस्थित काम करत नाहीत. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, शुगर पेशंट्समध्ये ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशात विनेगरचा उपयोग करणं शरीरासाठी हानिकारक ठरते. यामुळे हृदयावर सुजन येऊ शकते.

एका स्टडीनुसार अँपल साइडर विनेगरचं अधिक सेवन केल्याने तुमच्या दातांना पिवळेपणा वाढतोय. यात असलेलं अॅसिड दातांची सेंसिटीविटी वाढवतात.

चेहऱ्याची त्वचा आणि गळ्यात जळजळ होणे

एँपल साइ़डर विनेगरमुळे गळ्यात जळजळ होणे आणि त्वचेची आग होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे.

विनेगरचा योग्य उपयोग कसा करावा

विनेगर घेण्याचं प्रमाण सुरूवातील थोडे असावे. नंतर हळू हळू तुमच्या क्षमतेनुसार त्याचे प्रमाण वाढवत न्यावे. पाण्यात २ मोठे चमचे विनेगर घालून त्याचा उपयोग करावा. विनेगरचं सेवन केल्यानंतर पाण्याचा गरारे करावे. तसेच विनेगरचा सरळ त्वचेवर उपयोग करू नये. त्यामुळे चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT